Homeताज्या बातम्यासंपादकीय

कडवट शिवसैनिक हरपला

आजच्या राजकारणात पक्षनिष्ठा आणि व्यक्तीनिष्ठा सातत्याने बदलतांना दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर  अजित पवार गट बाहेर पडला, दु

विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
कारागृहातील प्रशासनाला हादरे
दादागिरीला झुकते माप

आजच्या राजकारणात पक्षनिष्ठा आणि व्यक्तीनिष्ठा सातत्याने बदलतांना दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर  अजित पवार गट बाहेर पडला, दुसरीकडे राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडून अजित पवार गट बाहेर पडला. त्यामुळे देशाच्या राजकारणात सातत्याने पक्षांतर, व्यक्तीनिष्ठा, पक्षनिष्ठा हे शब्द परवलीचे ठरत असतांना, मनोज जोशी मात्र शिवसेनेच्या जन्मापासून ते शेवटच्या श्‍वासापर्यंत पक्षासोबत होते. मात्र उतारवयात पक्षाकडून परवड झाली हे मान्यच करावे लागेल. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या मनोहर जोशी मास्तरांचे निधन झाले. शिवसेनेच्या 4 पिढ्यांसोबत त्यांनी काम केले. त्यांनी पक्षाचा खडतर आणि सुवर्ण असे दोन्ही काळ पाहिले, अनुभवले. मात्र त्यांनी कधीही पक्ष सोडला नाही. मनोहर जोशींचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीतून गेले होते. त्यांचे वडील भिक्षुकी करायचे, तर मनोहर जोशींनी आपले शिक्षण माधुकरी मागून केले होते. शिकण्याची प्रचंड तळमळ असल्यामुळे त्यांनी आपले शिक्षण माधुकरी मागून त्यांनी आपले एल.एल.बीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी मुंबईत सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन त्यांनी शिक्षण घेतले. किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली. वयाच्या 27 व्या वर्षी मनोहर जोशी ते एम. ए. एल. एल. बी झाले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते.2 डिसेंबर 1961 ला त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर 1967 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडले गेले. ते शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांनी शिवसेनेसोबत असलेली त्यांची नाळ घट्ट होती. मात्र उतारवयात दादरच्या शिवाजी पार्कवर मनोहर जोशींच्या विरोधात होणार्‍या घोषणा आणि त्याकडे उद्धव ठाकरेंनी केलेले दुर्लक्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर मात्र मनोहर जोशी यांना आपल्याला शिवसेनेत आता कोणतेही स्थान उरलेले नसल्याची जाणीव झाली. वास्तविक पाहता, महापौर, आमदार, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी अनेक पदे मनोहर जोशी यांनी शिवसेनेत भूषवली. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही.त्यांनी संयमित राजकारण करण्यावर भर दिला. बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत असत. महाराष्ट्रात 1995 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेनेच्या मनोहर जोशी यांच्या गळ्यात पडली. तर उपमुख्यमंत्रीपदी भाजप नेते गोपीनाथ मुंडे विराजमान झाले. शिवाजी पार्कवर आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात जोशी व मुंडे यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची कारकीर्द बहरात आली होती. पण 1999 मध्ये मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यावर पुण्यातील एका शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा आरोप झाला.जावयावर थेट आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोह जोशी यांचे मुख्यमंत्रीपद जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यातच जोशींनी बाळासाहेब ठाकरे यांना एक पत्र पाठवले. या पत्रानंतर मनोहर जोशी यांनी कोणतेही आढेवेढे न घेता आपला राजीनामा थेट राज्यपालांकडे सुपूर्द केला. मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण त्यांच्या मनात बाळासाहेबांप्रती कोणताही राग किंवा द्वेष नव्हता. त्यानंतर अनेकदा त्यांना याविषयी विचारणा झाली. पण त्या त्या वेळी त्यांनी पद देणार्‍यालाच तो काढून घेण्याचाही अधिकार असल्याचे निक्षुण सांगितले. असा हा कडवट आणि बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आपली छाप सोडून गेला. 

COMMENTS