Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्या पित्यानेच केली लेकीची हत्या

नांदेड प्रतिनिधी - जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केल्याची खळबळजन घटना नांदेडमध्ये घडली आहे. मृत मुलगी अल्पवयीन आहे. तिचे एका तरुणासह प्रेम

लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून नाराज झालेल्या मुलाने आईलाच संपवले
लोखंडी टॉमी डोक्यात मारून चेंदामेंदा करत वेटरची निर्घृण हत्या
अनैतिक संबंधातून मुलांनीच जन्मदात्यांची केली हत्या

नांदेड प्रतिनिधी – जन्मदात्या पित्यानेच लेकीची हत्या केल्याची खळबळजन घटना नांदेडमध्ये घडली आहे. मृत मुलगी अल्पवयीन आहे. तिचे एका तरुणासह प्रेम संबध होते. मात्र, पित्याला ते मान्य नव्हते. मुलगी प्रेम विवाहाचा हट्ट करत होती. यामुळे या अल्पवयीन मुलीची वडिलांनी कोयत्याने वार करुन हत्या केली. मात्र, आपला गुन्हा लवपवण्यासाठी या पित्याने जे केल ते पाहून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. प्रेमविवाहाचा हट्ट करणाऱ्या स्वतःच्या मुलीवर कोयत्याने वार करून पित्याने तिची हत्या केली. त्यांनतर मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करून तिचा अंत्यविधीही करून टाकला. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील ही घटना पोलिसानी शिताफीने उघडकीस आणली. मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसापूर्वी ही घटना घडली होती.

हत्या करुन मुलीच्या मृतदेहावर अत्यसंस्कार केले – मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते. मृत मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती. त्यांच्या प्रेमाला वडील अण्णाराव राठोड यांचा विरोध होता. पण मुलीने त्याच मुलाशी लग्नाचा अट्टाहास केला. तेंव्हा रागाच्या भरात अण्णाराव राठोड याने मुलीवर कोयत्याने वार केले. डोक्यावर गंभीर जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला. 2 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करुन अंत्यसंस्कार उरकून टाकण्यात आला.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांना याची कुणकुण लागल्यानंतर सखोल तपास करून खुनाचा उलगडा केला. मुक्रमाबाद पोलिसानी आरोपी अण्णाराव राठोड याला अटक केली आहे. यावेळी त्याने मुलीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.

COMMENTS