Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल १९ वर्षांनंतर धुळ्यात रंगणार राज्यस्तरीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा

धुळे प्रतिनिधी - धुळे शहरात १९ वर्षांनंतर गरुड मैदानावर राज्यस्तरीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा होते आहे. या स्पर्धेत तीन दिवसांत रोज ९० य

पायी दिंडीतील वारकर्‍यांना ओआरएस पावडरचे वाटप
’आप’ च्या शैली ओबेरॉय दिल्लीच्या नव्या महापौर
चित्रा वाघ यांनी महिला दिनानिमित्त इगतपुरीतील आदिवासी वाड्यापाड्यांना दिली भेट

धुळे प्रतिनिधी – धुळे शहरात १९ वर्षांनंतर गरुड मैदानावर राज्यस्तरीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा होते आहे. या स्पर्धेत तीन दिवसांत रोज ९० या प्रमाणे २७० कुस्त्या होतील. खेळाडूंना रोख रकमेसह विविध पदक, स्मृतिचिन्ह मिळून ३५ लाख २५ हजार रुपयांची बक्षीस देण्यात येतील. स्पर्धेचे ऑनलाइन प्रेक्षपण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

क्रीडा विभाग, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन उद्या बुधवारी सायंकाळी होईल. या वेळी क्रीडा विभागाच्या विभागीय उपसंचालक सुनंदा पाटील, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, क्रीडा विभागाचे गौरव परदेशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा तालीम संघाचे तालुका अध्यक्ष पै. कल्याण गरुड, सुनील चौधरी, उमेश चौधरी, कमलाकर अहिरराव आदी उपस्थित होते.

धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगीतले की, फ्री स्टाइल, ग्रीको रोमन व फ्रीस्टाइल महिला गटातून प्रत्येकी १०० मल्ल सहभागी होतील. विजेत्यांना रोख ३५ लाख ७५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येतील. याशिवाय सर्व साधारण विजेता, उपविजेत्यांसह सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक मिळेल. स्पर्धेसाठी तीन मॅटचे आखाडे केले आहे. मुख्य प्रवेशद्वारातून व्हीआयपींना तर पश्चिमेकडील व शिवाजी हायस्कूलजवळील प्रवेशद्वारातून प्रेक्षकांना प्रवेश असेल. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे.

धुळे शहरातील जेल रोड आणि डायटच्या मैदानात पार्किंगची सोय आहे. आंतरराष्ट्रीय पंच दिनेश भोंडे, पुण्याचे पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, अभिनेता देवदत्त नागे येणार आहे. मल्लांच्या भोजनाची व्यवस्था खेळाडूंच्या प्रतिनिधींशी चर्चा व विचार विनिमय करून केली आहे. स्पर्धेसाठी विविध समित्या स्थापन केल्या आहे. समाज माध्यमांवर स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.

COMMENTS