Homeताज्या बातम्यासंपादकीय

आत्मसन्मानाचा लढा पराभूत होत नसतो..!

 तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या वायकोम मंदिरात बहुजन समाज प्रवेशाच्या आंदोलनाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याब

स्व.शंकरराव घुले यांनी कष्टकर्‍यांसाठी आपले जीवन समर्पित केले : पोपटराव पवार
प.बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या
भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

 तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या वायकोम मंदिरात बहुजन समाज प्रवेशाच्या आंदोलनाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन या दोघांच्या उपस्थितीत एक संयुक्त समारोह पार पाडला. या समारोहामध्ये वायकोम मंदिर प्रवेशाचा शताब्दी  सोहळा होत असताना, पेरियार ई व्ही रामस्वामी नायकर यांनी ज्याप्रमाणे आत्मसन्मानाचे आंदोलन सुरू केले होते; ते व्यक्तीच्या आत्मसन्माशी जसे निगडित होते; तसे, आता राज्याच्या आत्मसन्मानासाठी दोन्ही राज्यांनी एकत्रपणे ‘सहअस्तित्व आणि सहकार’ या तत्त्वावर कारभार करणे अधिक उचित होईल, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले. तर, याच समारोहात तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी वायकोम सत्याग्रह भारतातील आत्मसन्मानाच्या आंदोलनाचा विजयी सत्याग्रह आहे. या सत्याग्रहाची आजही गरज आहे. राज्याच्या फेडरल सिस्टीमला जो धोका पोहोचला आहे, त्या विरोधात आजही लढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केले. अर्थात, वायकोम मंदिराच्या क्षेत्रामध्ये बहुजन समाज प्रवेशाच्या आंदोलनाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत; हे शताब्दी महोत्सव वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येत, येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या अधिकारांवर किंवा स्वातंत्र्यावर जे अतिक्रमण एक प्रकारे येऊ घातले आहे; त्या विरोधात फेडरल संरचना अबाधित राखण्यासाठी सह‌अस्तीत्व आणि सहकार या तत्त्वावर दोन्ही राज्यांचा भर राहील. कारण, या पुढील काळामध्ये राज्याच्या अधिकारांचे दमन करण्यासाठी किंवा फेडरल संरचना विरोधात एक भूमिका सुप्तपणे पुढे येत आहे. त्या विरोधात राज्यांना एकवटावं लागेल आणि म्हणून ही भूमिका घेऊन या पुढील काळात राज्य चालवणं अधिक महत्त्वाचं असल्याचं या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या या वेळीच्या भाषणांमधून स्पष्ट होते. वायकोम सत्याग्रह भारताच्या बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाच्या आंदोलनाच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे या सत्याग्रहाच्या निमित्ताने दोन्ही मुख्यमंत्र्यांनी  एकत्रित येऊन केवळ भारताच्या राजकीय स्थितीवर ते बोलत नाहीत; तर, येणाऱ्या काळामध्ये व्यक्तीचा आत्मसन्मान, स्वातंत्र्य दाबण्याचे जसे प्रयत्न होत आहेत, त्याचप्रमाणे राज्याच्या स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेलाही दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा एक प्रकारे त्यांनी आरोप केला. यामुळे फेडरल संरचनेला ज्या शक्ती धक्का देतील किंवा उध्वस्त करतील, त्या शक्तींच्या विरोधात नक्कीच लढा द्यावा लागेल, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली मते मांडली. वायकोम सत्याग्रह हा त्याकाळच्या केरळ आणि तामिळनाडूच्या सामाजिक नेतृत्वाच्या नायकांनी चालवला होता. केटी माधवन यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या, या लढ्याचे निर्णायक नेतृत्व मात्र पेरियार ई व्ही रामस्वामी त्यांच्या विचारांनी आणि कृती कार्यक्रमाने केले. वायकोम आंदोलनामागच्या प्रेरणेची आजही भारताला गरज असल्याचे प्रतिपादन या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. वायकोम  सत्याग्रह दक्षिण भारतात जातीव्यवस्थेच्या कर्मठ स्वरूपाला एक धक्का तंत्र मानले जाते. इथूनच बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचा इतिहासही सुरू होतो.

उत्तर भारतात याचे लोन निश्चितपणे पोहोचले होते/आहे. येणाऱ्या काळात या सामाजिक लढ्याची भारताला गरज असेल. असेच या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून जाणवले. पेरियार ई व्ही रामस्वामी नायकर हे केवळ दक्षिण भारताचेच आता नायक राहिले नाहीत; तर, बहुजन चळवळीने त्यांचे नायकत्व संपूर्ण देशभर पोचवलेले आहे. त्यामुळे उत्तर भारतातल्या कोणत्याही कार्यक्रमात जो बहुजन समाजाचा कार्यक्रम असेल, त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर यांच्याबरोबर चौथी प्रतिमा मात्र पेरियार ई व्ही रामस्वामी यांचीच असते. त्यामुळे वायकोमचा सामाजिक आत्मसन्मानाचा हा विजयी सत्याग्रह उत्तर भारताला देखील आपल्या कवेत घेतो. सामाजिक न्याय, आत्मसन्मान, सहअस्तित्व आणि सहकार या चार बाबी या लढ्याच्या माध्यमातून भारतीय जनमानसात बिंबवल्या गेल्या आहेत. कोणताही आत्मसन्मानाचा लढा देत असणाऱ्या मानवी समूहाला पराभूत करता येत नाही, हे जगाने आजपर्यंत लक्षात घेतले आहे.

COMMENTS