Homeताज्या बातम्यासंपादकीय

चिवट झुंज आणि विश्‍वचषकाचा थरार

कोणत्याही संघात केवळ प्रतिभावंत खेळाडू असल्यामुळे कोणताही संघ यशस्वी होत नाही, तर सांघिक कामगिरी ही महत्वाची असते. सांघिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट

विकासांच्या मुद्दयांना बगल
राजकारणात आणखी एक गांधी
मान्सूनची सलामी

कोणत्याही संघात केवळ प्रतिभावंत खेळाडू असल्यामुळे कोणताही संघ यशस्वी होत नाही, तर सांघिक कामगिरी ही महत्वाची असते. सांघिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियातील क्रिकेटमध्ये मक्तेदारी निर्माण केली होती. मात्र ही मक्तेदारी अनेक वर्षांपासून भारतीय संघाने मोडीत काढली आहे. तरी भारतीय संंघाला आयसीसीची ट्रॉफी उंचावता आली नव्हती. तब्बल 11 वर्षांचा दुष्काळ भारताने या ही ट्राफी उंचावत मोडून काढला. एकदिवसीय विश्‍चषकात देखील भारत अपराजित राहिला होता, मात्र फायनलमध्ये 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भारतीय संघ सत्यात उतरवू शकला नाही. सुरूवाताीपासूनचे सर्व सामने जिंकणारा भारताचा संघ शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला आणि भारताचे विश्‍वचषकाचे स्वप्न धुुळीस मिळाले होते. त्यादिवशी अनेक भारतीय खेळाडूंचे चेहरे डबडबल्याने संपूर्ण भारतीयांनी पाहिले. ती पराभवाची सल कर्णधार रोहित शर्माला सातत्याने सतावत होती. आणि त्यामुळेच रोहित शर्माने ठाम निश्‍चय केला होता की, एकदिवशीय विश्‍वचषक उंचावता आला नाही तरी, टी-20 चा विश्‍वचषक जिंकायचा. आणि या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत देखील भारत अपराजित राहिला. एकही सामना न हारता भारताने हा पराक्रम करून दाखवला. खरंतर शेवटच्या सामन्यात जेव्हा दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूमध्ये 30 धावा हव्या होत्या आणि अफ्रिकेच्या 6 विकेत शिल्लक असल्यामुळे मॅच भारताच्या हातून गेली अशीच भारतीयांची समज झाली होती. मात्र क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल, ते सांगता येत नाही. तसेच काहीसे या सामन्यात झाल्याचे दिसून आले. हार्दिक पंड्याने घेतलेली विकेट, आणि सूर्याने सीमारेषेवर अफलातून घेतलेला झेल, यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. जी दक्षिण अफ्रिका सहजपणे खेळत होती, ज्या संघाचे खेळाडू सहजपणे बॉलला सीमारेषेपार पाठवत होते, त्या संघाला शेवटच्या पाच ओव्हरमध्ये अर्थात 30 बॉलमध्ये केवळ 23 रनच करता आले. अर्थात यामध्ये सिंहाचा वाटा बुमराह आणि अर्शदीपच्या बॉलिंगचा देखील होता. संघाला गरज असतांना बुमराहने विकेट तर घेतलीच, शिवाय एका ओव्हरमध्ये केवळ 4 रनच दिले. दुसरीकडे अर्शदीपने देखील रनावर अंकुश लावण्यात यश मिळाले. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने दक्षिण अफ्रिकेच्या संघाला डोके वर काढूच दिले नाही. खरं पाहता हा सामना भारताच्या हातून गेला होता. मात्र जो संघ शेवटपर्यंत चिवट झुंज देतो, तो संघ विजयी होतो आणि भारताने शेवटच्या चेंडूपर्यंत चिवटपणा सोडला नाही, यामुळेच भारताचा विजय झाला. या सामन्यात किमान भारतीय संघ 200 धावा करणे अपेक्षित होते. आणि रोहित सेना त्याच इराद्याने संघात उतरली खरी पण रोहित, पंत आणि सूर्याची विकेट गेल्यानंतर भारतीय संघ बॅकफूटवर गेला. पहिल्याच षटकात आक्रमकपणा दाखवणारा विराट संथगतीने खेळतांना दिसून आला. त्यामुळे भारतीय संघ दीडशेपर्यंत तरी पोहोचेल की नाही, अशी शंका होती, मात्र त्याच विराटने गेअर टाकत संघाला 170 च्या वर पोहचवले. अर्थात यामध्ये महत्वाची भूमिका अक्षर पटेल, आणि शिवम दुबे यांची राहिली. या सामन्यात भारताने काही चुका केल्या असल्या तरी, भारतीय संघाने विजय मिळवल्यामुळे या चुका नजरअंदाज करता येईल. काही ओव्हरचा खेळ शिल्लक असतांना रोहितने बॅटिंगसाठी शिवम दुबेऐवजी हार्दिक पंड्याला पाठवणे गरजेचे होते. कारण हार्दिक पंड्या फॉर्ममध्ये असल्यामुळे भारतीय संघाला आणखी काही धावा जोडता आल्या असत्या. मात्र या चुका रोहितने क्षेत्ररक्षण करतांना भरून काढल्या. मॅच हातातून गेली असतांना रोहितने योग्यवेळी चेंडू हार्दिक, बुमराह आणि अर्शदीपच्या हाती सोपवला आणि भारताचा विजय सुकर झाला. खरंतर या सामन्यानंतर विराट आणि रोहितने टी-20 सामन्यांतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते. दोन दिग्गज खेळाडू, अतिशय प्रतिभावंत खेळाडू असा त्यांचा गौरव केला जातो, ते यापुढे टी-20 सामन्याचा भाग असणार नाही.

COMMENTS