Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्षेत्र महाबळेश्‍वर येथे कोरड्या विहिरीत पडला रानगवा

महाबळेश्‍वर / वार्ताहर : महाबळेश्‍वरपासून अंदाजे सहा किमी अंतरावर असलेल्या क्षेत्र महाबळेश्‍वर परिसरातील खासगी बंगल्याच्या जवळ असलेल्या कोरड्या व

Beed : महावितरणचा गलथान कारभार तार तुटून दोन एकर ऊस जळुन खाक ! (Video)
डिजीक्लेममुळे शेतकर्‍यांचा फायदा होईल ः कृषीमंत्री तोमर
राहुरी विद्यापीठाच्या हरभरा वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड

महाबळेश्‍वर / वार्ताहर : महाबळेश्‍वरपासून अंदाजे सहा किमी अंतरावर असलेल्या क्षेत्र महाबळेश्‍वर परिसरातील खासगी बंगल्याच्या जवळ असलेल्या कोरड्या विहिरीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास रानगवा पडला असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. विहिरीत पडल्याने रानगवा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली. शुक्रवारी सकाळी वनविभागाची टीम दाखल होत घटनेची माहिती घेतली.
रागव्याला बाहेर काढण्यासाठी महाबळेश्‍वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमसह नगरपालिका जेएसबी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, वनविभागाने पुणे येथील तज्ज्ञांच्या रेस्क्यू टीमला संपर्क साधला आहे. गुरुवारी पाण्याच्या शोधात हा गवा विहिरीत पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच विहीरीला कुंपन नसल्यामुळे रात्रीच्या वेळी रानगवा पडला असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.

COMMENTS