Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात 22 शेळ्यासह एक व्यक्ती जखमी

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील भटक्या कुत्र्यामुळे जवळपास 20 शेळ्यांसह 1 व्यक्तीजखमी झाले आहेत. इस्लामपूर शहरानजीक सरकारी दवाखान्याच्या पाठीमागच

कत्तलीसाठी नेताना दुभत्या गायींची गाडी पलटी
कृषी वीजबिल थकबाकीच्या 50 टक्केसवलतीसाठी राहिले फक्त 19 दिवस
पाटण-कोयना मार्गावरील अपघातात स्विफ्टचा चक्काचूर, 3 गंभीर जखमी

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील भटक्या कुत्र्यामुळे जवळपास 20 शेळ्यांसह 1 व्यक्तीजखमी झाले आहेत. इस्लामपूर शहरानजीक सरकारी दवाखान्याच्या पाठीमागच्या बाजूस असलेल्या विजय पाटील या शेतकर्‍याच्या गोट्यावर सकाळी पाच वाजता भटक्या कुत्र्यांनी त्यांच्या 22 शेळ्यावर हल्ला केला. शेतकर्‍याच्या शेडमध्ये शेळ्यांचे शरीराचे थोडे थोडे अवयव आढळून आले. शहरामध्ये अशी धक्कादायक घटना या ठिकाणी घडली आहे. त्याचबरोबर केबीपी कॉलेज रोडवर सार्वजनिक ठिकाणी रमेश पवार या व्यक्तीवर कळपातील एका भटक्या कुत्र्याने त्यांना जखमी केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
इस्लामपूर नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देऊनही असे प्रकार शहरांमध्ये सातत्याने घडत असल्याचे दिसून येते नगरपालिका आरोग्य विभागाच्या कुचकामी धोरणामुळे भविष्यात एखाद्या व्यक्ती किंवा लहान मुलावर हल्ला झाल्यास आणि ती व्यक्ती मृत झाल्यास नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील. महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून नगरपालिकेवर आंदोलन व निवेदन देऊन याचा निषेध केला. अजूनही एवढी मोठी घटना होऊन प्रशासन ढिम्म अवस्थेत आहेत. पशुवैद्यकीय विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. पण नगरपालिका परिसरात ही घटना होऊनही फक्त आश्‍वासन देण्यापलीकडे काही पावले उचलली नसल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे कुटुंब हवालदिल झाले आहेत. या घटनेची माहिती कळल्यानंतर महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात, सागर जाधव, किशोर पाटील व मनसेचे सतीश पवार यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

COMMENTS