Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवडमधील अतिक्रमन विरोधी कारवाई दुसर्‍या दिवशीही सुरु

म्हसवड / वार्ताहर : सिध्दनाथ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने पालिका जागेत व रस्त्यावर केलेली अतिक्रमण विरोधी कारवाई दुसर्‍

महाबळेश्‍वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकलसह बाईक रॅली
शेअर मार्केटिंग साठी तालुक्यात एजंटाचा सुळसुळाट : वर्षात डबल करून देणारे आज गायब
एकरकमी एफआरपीसाठी कारखान्यावर मोटसायकल रॅली

म्हसवड / वार्ताहर : सिध्दनाथ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने पालिका जागेत व रस्त्यावर केलेली अतिक्रमण विरोधी कारवाई दुसर्‍या दिवशी पालिकेने सुरु करुन महात्मा फुले चौक ते बस स्थानकपर्यंतची बस स्थानकाच्या बाजूकडील 40 दुकानावर 22 ते 25 वर्षानंतर पालिकेने प्रथमच बुलडोझर फिरवून रस्ता रथमार्गाला मोकळा करण्यात आला. ऐन यात्रा काळात व्यावसायिकांचे दुकाने बंद केल्याने अनेक तरुण व्यवसायिक या कारवाईमुळे बेरोजगार झाले असल्याची प्रतिक्रिया अतिक्रमण काढताना अनेकांनी बोलून दाखवली.
दोन वर्षे कोव्हीडचा काळ असल्याने यात्रा होऊ शकली नाही. यावर्षी कोव्हीड मुक्त यात्रा होणार असल्यामुळे 4 ते 5 लाखावर भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच माणगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने निम्म्याच्या वर नदी पात्रात भरत असलेली यात्रा मात्र यावर्षी पाणी असल्याने सर्व यात्रा पटांगणासह शहरातील बाजार तळ व मोकळ्या जागेत भरणार असल्याने आणि रथमार्गावर नदीपात्रात पाणी असल्याने रथ बायपास रोडने मंदिराच्या पाठीमागून पालिका इमारत, महात्मा फुले चौक ते बस स्थानक, चौक ते वडजाई ओढा ते ज्ञानवर्धीनी हायस्कूल मरीआई मंदिर ते यात्रा पटांगण असा रथोत्सव होणार आहे. या मार्गावर अतिक्रमण केलेली दुकाने दोन दिवसापासून पालिका प्रशासन व पोलीस बंदोबस्तात पालिका कर्मचारी दुकाने काढत आहेत. बस्थानक परिसरातील दुकाने 10 वर्षापूर्वी गटार बांधकाम करण्यासाठी काढली होती. त्यानंतर दोन वेळा नदीला पाणी आल्यावर याच रोडने रथ ओढत नेहला होता. त्यावेळी ही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच 25 वर्षापूर्वी या परिसरातील अशा पध्दतीने सर्व दुकाने काढण्यात आली होती. त्यावेळी त्यावेळच्या सत्ताधारी गटाला विरोधाला सामोरे जावे लागले होते. अतिक्रमण कारवाई थांबवण्यासाठी माजी नगराध्यक्षानी मुख्याधिकारी सचिन माने यांना भेटुन कारवाई थांबवण्याची मागणी केली. मात्र, मुख्याधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांचा आदेश असल्याने मला अतिक्रमण काढणे भाग असल्याचे सांगून कारवाई थांबवणार नसल्याचे सांगितले.

COMMENTS