Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉईज ४’चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई प्रतिनिधी - विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ या मराठी सिनेमाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या

स्वाभिमानी करणार 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन
श्री सिद्धिविनायक शाळेतील बौद्धिक अक्षम – बहुविकलांग मुलांसमवेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
अहमदनगर : श्री विशाल गणेशाच्या चरणी सोन्याचा मोदक अर्पण

मुंबई प्रतिनिधी – विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ या मराठी सिनेमाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या कलाकारांचे पोस्टर झळकले होते. यामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या मुख्य भूमिका बघायला मिळणार आहे. यामुळे एकंदरीत ही सगळी मंडळी कल्ला करणार हे निश्चितच आहे.

बॅाईज, बॅाईज २ आणि बॅाईज ३ मधील धैर्या, ढुंग्या आणि कबीरची मैत्री आपल्या सर्वांना चांगलच माहित आहे. या मैत्रीने अवघ्या महाराष्टामध्ये जोरदार धुमाकुळ घातला होता. परंतु टिझरमध्ये त्यांच्या या मैत्रीमध्ये आता दरार आल्याचे बघायला मिळत आहे. आता ही मैत्री संपुष्टात येणार की त्यांची ही गॅंग आणखी वाढणार असल्याचे लवकरच प्रेक्षकांना येत्या २० ॲाक्टोबर दिवशी बघायला मिळणार आहे. एवढे मात्र नक्की आहे की, हे अफलातून कलाकार यंदा पुन्हा एकदा जोरदार धिंगाणा घालणार आहे.दिग्दर्शक विशाल देवरू खकर याने सांगितले आहे की, ‘या तिघांच्या मैत्रीची सुरूवात, चांगल्या, वाईट प्रसंगी एकमेकांना दिलेली साथ, थट्टामस्करी आणि याअगोदरच्या तीन भागांमध्ये सर्वांनी बघितलेली आहे. परंतु आता या मैत्रीमध्ये एक नवा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ’बॉईज’ च्या प्रत्येक भागाने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे. सिनेमातील कलाकार तेच असले तरी प्रत्येक वेळी आम्ही चाहत्यांसाठी कथेत वेगवेगळे वळणे आणली आहेत. यावेळी देखील असेच काहीतरी भन्नाट सरप्राईज मिळणार आहे.

COMMENTS