Homeताज्या बातम्या

त्या न्यायमूर्तींनी लंडनमध्ये 400 कोटींचा घेतला बंगला : संजय राऊत

मुंबई : राज्यात घटनाबाह्य सरकार वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींवर दबाव होता. इतकेच नव्हे तर एका न्यायमूर्तींनी आणि त्यांच्या कुटु

 गावोगावच्या शाळांना राजकारणाचा अड्डा बनवू नका ः भरत आंधळे
स्वदेस चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री गायत्री जोशीचा इटलीत अपघात
मारहाणप्रकरणातील सर्व 14 आरोपींना तुरुंगवास

मुंबई : राज्यात घटनाबाह्य सरकार वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींवर दबाव होता. इतकेच नव्हे तर एका न्यायमूर्तींनी आणि त्यांच्या कुटुंबांने लंडनमध्ये 300-400 कोटींचा रूपयांचा बंगला खरेदी केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच या बंगल्यासाठी कोणाच्या पैशांचा वापर झाला, हे मी लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयावरती कमालीचा दबावासह इतर अनेक बाबी असू शकतात. निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी आमदार अपात्रेसंदर्भात न्यायालय निर्णय घेणार नसेल तर, हे घटनाबाह्य सरकारला न्यायालयाने समर्थन असल्याचे दिसून येते. घटनाबाह्य सरकार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चालू देतात आणि आम्हाला तारखांवर तारखा देतात. त्यामुळे या देशाचा सर्वोच्च न्यायालयावरील विश्‍वास उडून गेला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या सर्व काळामध्ये कोणत्या न्यायाधीशाने आणि त्याच्या कुटुंबियांनी लंडनमध्ये 300 ते 400 कोटी रुपयांचा व्हिला खरेदी केला आहे. आणि तो कोणाच्या पैशाने खरेदी केला आहे आणि त्या बदल्यात महाराष्ट्रातील सरकार कसे वाचवण्यात आले, हे मी लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे. या संदर्भात आपण लवकरच माहिती देणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हे सरकार वाचवायला या मागे फार मोठे कारस्थान आणि षड्यंत्र होते, असा आरोप देखील राऊत यांना केला आहे. हे सरकार वाचवण्यासाठी हजारो कोटी रुपये अडीच वर्षात खर्च झाले आहेत. आमची न्याय यंत्रणा संविधानाचे रक्षण करण्यामध्ये अपुरी पडली, असे दुर्दैवाने म्हणावे लागत असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

COMMENTS