मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटानंतर आता त्यांच्या आमदारांच्या अडचणी देखील वाढतांना दिसून येत आहे. कारण ठाकरे गटाचे प्रमुख उद्
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटानंतर आता त्यांच्या आमदारांच्या अडचणी देखील वाढतांना दिसून येत आहे. कारण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झाल्यामुळे वायकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. वायकर यांनी मुंबईच्या जोगेश्वरी येथील महापालिकेच्या राखीव भूखंडावर एक पंचतारांकित हॉटेल बांधल्यासंबंधीची ही तक्रार होती. रवींद्र वायकर यांनी हे हॉटेल बांधण्यापूर्वी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठीही बोलावले होते. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे वायकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती की, मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी येथील राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले. मात्र, वायकर यांनी त्यासाठी मुंबई पालिकेकडून परवानगीच घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. याप्रकरणी रवींद्र वायकर व त्यांच्या पत्नीसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांनीदेखील या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या जागेवर हॉटेलचे बांधकाम करताना तथ्य लपवल्याचा आरोप या सर्वांवर आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावदेखील कोविड बॅग घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीकडून किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू असल्याने पेडणेकर अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची कोंडी होताना दिसत आहे.
COMMENTS