Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भ, मराठवाडा, खानदेशात विजांसह पावसाचा अंदाज

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात पुन्हा एकदा मान्सूनचे आगमन झाले असून, राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र राज्यात आज शनिवार

मदुराईजवळ रेल्वे डब्यात गॅस सिलिंडरचा स्फोट ८ ठार, २० जण जखमी
जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर पुन्हा भेगा
महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन ; सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असलेले दहापैकी नऊ जिल्हे महाराष्ट्राचे

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात पुन्हा एकदा मान्सूनचे आगमन झाले असून, राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र राज्यात आज शनिवारी विजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला.
 विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला.तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने शनिवारी विर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच खानदेश जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला

COMMENTS