नागपुर प्रतिनिधी - मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ता याचे प्रकरण शुक्रवारी उघड झाले. सलीम कुत्

नागपुर प्रतिनिधी – मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ता याचे प्रकरण शुक्रवारी उघड झाले. सलीम कुत्तासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पार्टी केल्याचा आरोप झाला. सलिम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यासंदर्भातील फोटो दाखवत गंभीर आरोप केले. सुधाकर बडगुजर याला कोणाचा वरदहस्त आहे, त्याला हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाकडून कसे संरक्षण दिले जात आहे, शिवसेना भवन बॉम्बस्फोटाने उडवण्याचा कट करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही समोर आणावे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली. या प्रकरणात एसआयटी चौकशीची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख आहे.
नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा फोटो दाखवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे आक्रमक झाले. ते म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महानगर प्रमुख देशद्रोहीसोबत पार्टी करत आहेत. मग या सुधाकर बडगुजर याला वाचवण्यासाठी कोण फोन फोनी करत आहे. देशद्रोहसोबत डान्स पार्टी करणाऱ्यांना वाचवणारी राजकीय शक्ती कोण आहे? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? सुधाकर बडगुजर याचे लागेबांधे कोणाशी आहे. बडगुजर हा छोटा मासा आहे. या प्रकरणात मोठ्या व्यक्तीलाही उघड करावे, अशी मागणी केली
COMMENTS