टीईटी घोटाळा : 25 किलो चांदी आणि दोन किलो सोने जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टीईटी घोटाळा : 25 किलो चांदी आणि दोन किलो सोने जप्त

पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांचा तपास अजूनही सुरूच असून, आरोपींनी मोठया प्रमाणात रोकड हस्तगत

बुलडाण्यात अपघातात तीन कामगांराचा मृत्यू
“फडणवीस…! डबक्यात बेंडुक असतात, त्यात उतरू नका” | LOK News 24
पोलीस ठाण्यात विष पिऊन युवकाची आत्महत्या… | DAINIK LOKMNTHAN

पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी अर्थात टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांचा तपास अजूनही सुरूच असून, आरोपींनी मोठया प्रमाणात रोकड हस्तगत करण्यात येत आहे. या घोटाळयाचा सूत्रधार तुकाराम सुपेच्या मित्राकडून 5 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तर आता जीए. कंपनीचा माजी संचालक अश्‍विन कुमार यांच्या घरातून 25 किलो चांदी, 2 किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत.
तुकाराम सुपेकडून आजवर हस्तगत करण्यात आलेल्या घबाडाची रक्कम 3 कोटी 93 लाखांपर्यंत पोहोचली आहे. इतकंच नाही तर आणखी काही रक्कम असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. मग या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्‍विन कुमारच्या घरातून 14 किलो चांदी आणि 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्‍विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख आहे. पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणणार आहेत. पुणे पोलीस सौरभ त्रिपाठीची चौकशी करणार आहेत. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.

पुणे पोलिस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने : उपमुख्यमंत्री पवार
महाराष्ट्रातील आरोग्य भरती, म्हाडा आणि टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे पोलीस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे. असे पुन्हा घडू नये. यात राजकारण आणू नये. सीबीआयला भरपूर कामे आहेत. आपल काम पोलीस सक्षमपणे काम करते. याआधी ही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली. सुशांत सिंह प्रकरणात काय झाले? शेवटी आत्महत्या आहे हेच पुढे आले. उगाच आभास करू नये. आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसर्‍या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू असेही ते म्हणाले.

COMMENTS