Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सार्वजनिक बांधकाम विभागात हजारो कोटींचा टेंडर घोटाळा

कार्यकारी अभियंता रूपाली पाटील यांचा 124 कोटींचा अपहार

मंगेश पंचपोर यांजकडूनमुंबई ः ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागातांर्गत पनवेल सा.बां. विभागातील कार्यकारी अभियंता श्रीमती रूपाली पाटील यांच्या भ्रष्टाच

सचिव भांगे पालकमंत्री भुमरे, आ. शिरसाटांना ठरले भारी
सचिव सुमंत भांगे हाजिर हो—-
पुणे रिंगरोडप्रकरणात जनतेच्या पैश्यांची लूट

मंगेश पंचपोर यांजकडून
मुंबई ः
ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागातांर्गत पनवेल सा.बां. विभागातील कार्यकारी अभियंता श्रीमती रूपाली पाटील यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक किस्से समोर येत असून, त्यांनी श्रीमती रूपाली पाटील आणि त्यांच्या विभागातील तीन लरअभियंते यांनी शासकीय नियमांना केराची टोपली दाखवत काही महिन्यांपूर्वी मेंटेनन्स खाली दिलेल्या रस्त्यावर सुधारणा दाखवून, तब्बल 124 कोटी 47 लाख 43 हजाराची बोगस निविदा काढून 124 कोटींचा अपहार केल्याचे दिसून येत आहे.

जनतेच्या पैशांतून विकासाची कामे होणे अपेक्षित असतांना पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये याच जनतेच्या पैशांची लूट सध्या सुरू आहे. श्रीमती पाटील यांनी आपल्या मर्जीप्रमाणे आणि वरिष्ठांची कोणतीही पूर्वपरवानगी घेता बोगस निविदा काढण्याची कामे सुरू केली आहेत. यातून तब्बल 124 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे.  सन 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात काढण्यात आलेल्या निविदांचा बारकाईने अभ्यास केल्यास या निविदा काढण्यात आलेल्या तारखांवरून स्पष्ट होते की, या निविदा बोगस काढण्यात आल्या आहेत. पनवेलमधील गव्हाणफाटा-खारपादा-सावरोळी राज्य महामार्ग 104, उरण-पनवेल राष्ट्रीय महामार्ग 103, कोण सावळे रस्ता राज्य महामार्ग 105, जअसई न्हावा राष्ट्रीय महामार्ग 108 या मार्गांवरील रस्त्यांसाठी काढण्यात आलेल्या निविदा आणि त्यावरील तारखेवरून स्पष्ट होते की, या निविदांमध्ये तब्बल 124 कोटींचा अपहार कार्यकारी अभियंता श्रीमती रूपाली पाटील यांनी केल्याचे दिसून येत आहे.

वास्तविक पाहता सातत्याने होणार्‍या गैरव्यवहारावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 29 नोव्हेंबर 2016 रोजी (एक रस्ता एक निविदा) जी.आर. क्र. 165 मंजूर करुन अंमलात आणला. रस्त्याचा सर्वांगीण विकास करण्याकरीता सदर रस्ता मेंटेनन्स खाली देण्याचा निर्णय घेण्यात आला, सदर रस्ता देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदारानी करण्याची तरतुद त्यामध्ये आहे. अशा शर्तीवर करार करण्यात आला आहे. असे असता, पनवेल येथील कार्यकारी अभियंता रूपाली पाटील यांनी शासन निर्णयाला न जुमानता मेंटेनन्स खाली असलेल्या रस्त्यावर सुधारणा दाखवुन 124 कोटीची लुट केली आहे. सेवेत असतांना पनवेल येथील कार्यकारी अभियंता यांनी अफाट संपत्ती जमा केली असल्याची चर्चा देखील जोर धरत आहे. त्यामुळे या 124 कोटींच्या निविदांची आणि श्रीमती पाटील यांनी जमविलेल्या अचाट संपत्तीची लाचलुचपुत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

याच त्या तारखा आणि निविदा
1) गव्हाणफाटा-खारपादा सावरोळी रा.म.104  

COMMENTS