Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कडबा खरेदीकडे शेतकर्यांचा कल

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई तालुक्यात शेतकरी आता कडबा खरेदीकडे वळले आहेत. ग्रामिण भागात जावून कडब्याची खरेदी शेतकरी करीत आहेत. सध्या कडब्याच्

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात सापडलेत
अल्पवयीन मुलांसमोर विवस्त्र होणे बाल लैंगिक शोषण
कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे नगर शहराचे आमदार होतील

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई तालुक्यात शेतकरी आता कडबा खरेदीकडे वळले आहेत. ग्रामिण भागात जावून कडब्याची खरेदी शेतकरी करीत आहेत. सध्या कडब्याच्या पेंड्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यासह जिल्ह्यात शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. प्रत्येक शेतकर्यांकडे दूध देणार्या गाई, म्हशी आहेत. या भागात शेतकरी दरवर्षी कडबा खरेदी करून मोठ्या प्रमाणात साठवणूक करत असतात. आताच खरेदी केलेला कडबा उन्हाळा व पावसाळा या ऋतूमध्ये जनावरांना उपयुक्त ठरतो. सुरुवातीलाच कडब्याची प्रतिपेंडी 15 ते 20 रुपयांना मिळत आहे. पुढील काही दिवसांत एका पेंडीचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात शेतकरी कडबा खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. या भागात सध्या कडब्याची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक, टेम्पो यातून कडबा वाहतूक करताना दिसत आहेत. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. उन्हाळ्यातील चाराटंचाई लक्षात घेऊन आम्ही आतापासूनच कडबा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या 15 ते 20 रुपये कडब्याची पेंडी आम्ही विकत घेतल्याचे दुग्ध व्यवसायिक सांगत आहेत.

COMMENTS