Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर तरगावफाट्याला न्याय; रस्त्याच्या सुधारणेसाठी तीन कोटींचा निधी मंजूर

मसूर / वार्ताहर : अपघाताचा केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाणारे कराड कोरेगाव रोडवरील तारगाव फाटा हे ठिकाण असून मसूरपासून उत्तरेस साधारण पाच किलोमीटर अ

राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावेत : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील
प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांचा वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर मोर्चा
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

मसूर / वार्ताहर : अपघाताचा केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाणारे कराड कोरेगाव रोडवरील तारगाव फाटा हे ठिकाण असून मसूरपासून उत्तरेस साधारण पाच किलोमीटर अंतरावर असणार्‍या या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून अपघाताच्या सतत घटना घडत आहेत. एका बाजूस खराडे गाव तर समोर तारगाव नांदगावला जाणारा रस्ता आणि उजवीकडे हेळगाव मार्गे कोरेगावला जोडणारा मार्ग. चारही बाजूकडून वाहनांची सतत वर्दळ असणार्‍या ह्या फाट्यावर अरुंद रस्ता, दोन बाजूकडून वळण, आरफळ कालव्यावरील पूल, रस्त्यकडेला दुकानांचे अनेक गाळे, खराडे हायस्कूल, बस स्टॉप अशा अनेक बाबींमुळे या चौकात अपघाताच्या सतत घटना घडत आहेत.
उसाचा गळीत हंगाम सुरू झाला की आठवड्यातून एकदा तरी उसाचे ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटना सतत घडत असतात. याशिवाय दुचाकी, चारचाकी वाहनांचा अपघात होऊन अनेकजण जायबंदी झाले आहेत. काहींना आपला प्राणही गमवावा लागला आहे. यामुळे हा चौक अपघाताचा केंद्रबिंदू ठरत होता. सतत घडणार्‍या या घटनेने प्रवाशांच्या मनात या ठिकाणाहून प्रवास करताना भितीचे सावट निर्माण होते.
सर्व बाबींचा विचार करून येथील रस्ता रुंदीकरण आणि सुधारणा करणे ही गरज होती. याबाबतची तक्रार परिसरातील अनेक गावातील कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतींनी वारंवार आपल्या लोकप्रतिनिधींकडे, शासनाकडे व समंधित खात्याकडे करत होते. राज्याचे सहकारमंत्री व पालकमंत्री सातारा यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ता रुंदीकरण आणि सुधारणा करणे या कामासाठी सुमारे तीन कोटींचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
या कामास निधी मिळावा यासाठी बेलवाडी गावचे युवक भरत फडतरे यांनी परिसरातील सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचेसमवेत खा. श्रीनिवास पाटील व ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला प्रशासनाने ही साथ दिली. अखेरीस त्यांच्या प्रयत्नाला यशही आले. खराडे गावच्या सरपंच सौ. सुनीता जाधव आणि सदस्य मोहन बर्गे यांनीही मोलाचे सहकार्य केले. कामास निधी दिलेबद्दल त्यांनी खासदार व नामदार साहेबांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानले.

COMMENTS