अकोले/प्रतिनिधी ः हिंदू तरुणांना धर्मरक्षणासाठी एकत्र करण्याचे काम देवस्थानांनी केले पाहिजे. यासाठी व्यायामशाळा व वाचनालय सुरु करावे. तेच युवक आप
अकोले/प्रतिनिधी ः हिंदू तरुणांना धर्मरक्षणासाठी एकत्र करण्याचे काम देवस्थानांनी केले पाहिजे. यासाठी व्यायामशाळा व वाचनालय सुरु करावे. तेच युवक आपले मंदिरे वाचवतील असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले. कळसेश्वर देवस्थानला कालीचरण महाराज यांनी दिली भेट.
कळस बु.येथील कळसेश्वर देवस्थान येथील प.पू सुभाष पुरी महाराज व माता वैष्णवी देवी दर्शन घेण्यासाठी आले त्यावेळी कालीचरण महाराज यांनी भाविकासी संवाद साधला. कळसेश्वर टेकडी चा प.पू सुभाष पुरी महाराज यांनी केलेला कायापालट पाहून कालीचरण महाराज भारावले. यावेळी ईश्वरदास महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल महाराज वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, सचिव गोपीनाथ पाटील ढगे, ट्रस्टचे उपाध्यक्ष विष्णु वाकचौरे, विश्वस्त प्रदीप वाकचौरे आदी उपस्थित होते. कालीचरण महाराज म्हणाले की, मुसलमान यांची लोकसंख्या वाढल्या नंतर आपले सर्व देवस्थान राहणार नाही. यापूर्वी पाच लाख मंदिरे फोडली आहेत. आताची मंदिरे वाचवण्यासाठी हिंदूत्ववादी संघटना निर्माण केल्या पाहिजे. युवकांची धडधाकडं फळी निर्माण केली पाहिजे. त्यांना व्यायामाची सवय लावली पाहिजे. यासाठी देवस्थानांनी व्यायामशाळा निर्माण करणे आवश्यक आहे. देवस्थानच्या वाचनालयात कट्टर हिंदूची पुस्तके ठेवली पाहिजे. ज्ञानसंवर्धन करण्याचे काम केले पाहिजे, सर्वांना धर्माचे शिक्षण दिले पाहिजे. हिंदू मतदानासाठी बाहेर पडत नाही. असेही मत त्यांनी व्यक्त केले. माझे गुरु अगस्त महाराज आहेत. त्यांनी मला दर्शन दिले आहे. अकोले तालुका गुरुस्थानाला आहे. अगस्ती महाराज देवस्थान हे साडेसात हजार वर्षाचे पुरातन हे ठिकाण आहेत. तर कळस चे मंदिर पाच हजार वर्षाचे आहे. युवकांचे शिबीर आयोजित करायचे असून त्यासाठी कळसेश्वर देवस्थानची निवड करू असे मतही त्यांनी व्यक्त केले. कळसेश्वर देवस्थान वरील वैष्णवी देवी ची विलोभनीय मूर्तीला पाहून लोटांगण घालून दर्शन घेतले. अखंड पेटती धुनीला वंदन करताना तिची रक्षा कपाळी लावली. सुभाष पुरी महाराज यांनी केलेले वृक्ष संवर्धनाच्या कामाची स्तुती केली. कार्यक्रम यशश्वी काम राहुल वाकचौरे, राजेंद्र खताळ, विवेक वाकचौरे, स्वप्नील मेमाणे, राजाभाऊ वाकचौरे, पुरुषोत्तम सरमाडे, अभिषेक वाकचौरे, ओम वाकचौरे, राम शेटे यांनी केले.
COMMENTS