Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कास रोडवरील अनधिकृत बांधकामांना तहसीलदारांनी ठोकले टाळे

सातारा / प्रतिनिधी : कास परिसरात बांधकाम करण्यावर काही निर्बंध असतानाही अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरु आहे. या बेकायदेशीर बांधकामांना नोटीशी

बेकायदेशीररित्या बस चालविल्याबद्दल आ. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा
म्हसवडमध्ये श्री सिध्दनाथांचे अतिकडक असे उभ्या नवरात्राचे व्रत सुरु
सांगली जिल्ह्यातून राज्यात गांजासह अंमली पदार्थ पुरवण्याचे काम

सातारा / प्रतिनिधी : कास परिसरात बांधकाम करण्यावर काही निर्बंध असतानाही अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरु आहे. या बेकायदेशीर बांधकामांना नोटीशी देऊन ठोकण्याची मोहीम सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी हाती घेतली असून आज यवतेश्‍वर परिसरातील बांधकामांना टाळे ठोकताना त्यांच्यासह त्यांचे पथक दिसून आले.
कास रोडवरील नव्याने झालेल्या बेकायदेशीर बांधकामांना नोटीशी देऊन टाळे ठोकले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे कास रोडवरील हॉटेल व्यावसायीक व बांधकाम केलेल्यामध्ये सभ्रंम अवस्था निर्माण होऊन घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार वर्षांपूर्वी पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांनी प्रशासनाला कास रोडवरील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी कारवाई होणार या भीतीने स्थानिक व्यावसायिक भूमिपुत्रांनी संघटीत होऊन कोर्टात धाव घेतली होती. ती केस अदयाप न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना वगळून आता नव्याने झालेल्या बांधकामांवर धडक कारवाई करण्याची मोहिम सातारा तहसीलदारांनी हाती घेतली आहे. नोटीस देऊन बांधकामे सील केली जात आहेत. त्यामुळे अनेक धनिकांसोबत स्थानिक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कास-बामणोली परिसरात निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणात असल्याने पर्यटनाला अधिक चालना मिळाली आहे. जगभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात या भागाकडे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. त्यामुळे या भागाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या परिसरात धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात जमीनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामांसाठी काही ठिकाणी निसर्गाची हाणी केलेली पहायला मिळते. स्वत:च्या उपजिवीकेसाठी व येणार्‍या पर्यटकांना सुविधा मिळण्यासाठी काही स्थानिकांनी कर्जबाजारी होऊन हॉटेल व्यावसाय ऊभे केले आहेत. मात्र, महसूल विभागाकडून कारवाई होणार असल्याने त्यांनाही धडकी भरू लागली आहे.

COMMENTS