पिढीचे भान ठेवा!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पिढीचे भान ठेवा!

सामाजिक हितांचे संवर्धन नजरेसमोर ठेवून आपल्या कायदा सुव्यवस्थेने काम करावे हे अपेक्षीत आहे,तथापी कायदा सुव्यवस्था राबविणारे हात आणि या हातांचे संचालन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंदोलन आणि मिशन ! 
राज्यसभेचा राजकीय खेळ !
शेणाची निवडणूक! 

सामाजिक हितांचे संवर्धन नजरेसमोर ठेवून आपल्या कायदा सुव्यवस्थेने काम करावे हे अपेक्षीत आहे,तथापी कायदा सुव्यवस्था राबविणारे हात आणि या हातांचे संचालन करणारा मेंदू मानवी असल्याने व्यक्तीगत हितसंबंधाची बाधा होते.सध्या चर्चेत असलेले आर्यन खान हे प्रकरण या बाधेचे दुर्दैवाने उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे आर्यन खान पकडला गेला त्याचे दुःख अजिबात नाही,पण या प्रकरणाच्या खांद्यावर तीरकमान ठेवून सुरू असलेला लक्षवेध क्लेशदायक आहे.
भारतीय अंमली पदार्थ कायद्याची खरी गंमत आहे,भारतातून अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन व्हावे असा या कायद्यामागचा खरा उद्देश आहे.तथापी प्रत्यक्ष अंमलबजावणी करतांना समोर येत असलेले वास्तव वेगळीच भयानकता दर्शवते.त्या भयानकते पाठोपाठ सुरू होणारे राजकारण आणखी किळसवाणे आहे.भारतात व्यसनांचे अनेक प्रकार आहेत,त्यात अंमल आणणारे पदार्थ एकूणच सामाजिक आणि व्यक्तीगत पातळीवर खोलवर हानी पोहचवतात म्हणून त्यांच्यावर बंदी आणून अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे बंधन आणण्यात आले आहे.अंमली पदार्थ बाळगणे ,त्यांचा व्यापार करणे,नशा करणे अशा विविध बाबींना या कायद्याने अटकाव करण्यात आला आहे.या प्रत्येक बाबीसाठी या कायद्यात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला जातो,यात काही अल्प प्रमाणात अंमली ऋदार्थ सापडले तर त्याच्यावर शक्यतो गुन्हा दाखल केला जात नाही,यात शक्यतेचे प्रमाण  व्यक्तीची पत ठरवते.असो,हा आणखी वेगळा मुद्दा आहे.समजा एखाद्या तरूणाकडे अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्ज सापडले तर त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली जाते.आता ही विचारपूस हवा पाण्याची चौकशी करावी इतक्या सहजपणे नक्कीच होणार नाही.त्याच्याकडे सापडलेले ड्रग्ज त्याने एकतर स्वतःचा अंमल भागविण्यासाठी बाळगले असेल किंवा वितरणासाठी म्हणजे व्यापार करून पैसे कमावण्यासाठी बाळगले असेल.कारण कुठलेही असो,तो माल त्याने कुठून खरेदी केला याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा मुळापर्यंत जाणारच,त्यात वावगे काही नाहीच.संबंधीत संशयीत स्वतःसाठी ते ड्रग्ज बाळगत असेल तर तो त्याची तशी कबूली देईल.तपास पुर्ण होऊन त्याला  पुनवर्सन केंद्रात दाखल केले जाईल.पण तरीही या ठिकाणी एक प्रश्न उरतोच..तो माल आला कुठून? मग इथून तपास यंत्रणांचा खरा तपास सुरू होतो आणि एकएक धागा उलगडत जातो.म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये अनेक दिवस ,प्रसंगी काही महिने संशयीतांना जामीन मिळत नाही.सध्या चर्चेत असलेले आर्यन खान प्रकरणही याच जातकुळीतील आहे.अशा संशयीतांना जामीन मिळावा म्हणून व्यवस्थेतील एक गट मात्र पोटतिडकीने धडपड करीत असतो.आर्यन प्रकरणातही हेच वास्तव आहे.
अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे  अपयश चव्हाट्यावर येण्यास आणखी एक कारण आहे,अंमली पदार्थांची तस्करी करणारे किंवा या तस्करीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणाऱ्या मंडळींचे उदात्तीकरण करणारी   आजची अधिष्ठान नसलेली माध्यम कायद्याच्या पराभवाला खऱ्या अर्थाने कारणीभूत आहेत.उदाहरण द्यायचे झाले तर अलिकडच्या काही ताज्या तवान्या घडामोडींचे देता येईल.आर्यन खान आणि अगदी ताजी घटना म्हणजे अनन्या पांडेच्या भवताली एनसीबी आवळलेले फास.अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन राजजकीय मंडळींसह माध्यमांनीही बदलायला हवा.कुणाला किती जागा द्यायाची याची निश्चिती करायला हवी.या कथित प्रतिष्ठीत धेंडांच्या बिघडलेल्या अवलादींसाठी राष्ट्राची एकूण व्यवस्था आणि समाज हित वेठीस धरण्याचा प्रमाद राजकारणी आणि प्रसार माध्यमांनीही करणे अपेक्षीत नाही.पृथ्वी गोल आहे हे वैज्ञानिक सत्य आहे,एक ध्रूव काही काळानंतर पुन्हा मुळ जागेवर फिरून येणार हे वास्तव माहीत असतांनाही आपली एक पिढी अंमली पदार्थांच्या गटारीत आपल्याच हाताने आपण ढकलावी असे वातावरण तयार करणार असू तर कदाचीत आपलेच एखादे कार्टे या गटारीत फसणार नाही कशावरून ?निदान एव्हढे भान तरी बाळगणार की नाही!

COMMENTS