श्रीनगर ः दक्षिण काश्मीरच्या नौपुरा पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी एका मजुराची हत्या केली. मजुरावर गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. य

श्रीनगर ः दक्षिण काश्मीरच्या नौपुरा पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी एका मजुराची हत्या केली. मजुरावर गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर पोलीस सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाच्या जवळील परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करत शोध मोहीम चालू केली. मागील 24 तासात ही दुसरी घटना आहे. मुकेश कुमार, असे मृताचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो काही काळ पुलवामा येथे मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता.
COMMENTS