Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तन्मय कुंभार याची एअर पिस्तुल खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पाचगणी / वार्ताहर ः श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजच्या तन्मय सुविचार कुंभार याची 10 मीटर एयर पिस्तुल खेळ प्रकारात उत्तर प्रदेश येथे होणार्‍या नॅशनल

फलटणमध्ये वाळू वाहतुक तस्करावरावर कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून कराडकरांसह लोकप्रतिनिधींची दिशाभूल
जरंडेश्‍वरला भुयारी मार्गात दगडगोटे

पाचगणी / वार्ताहर ः श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजच्या तन्मय सुविचार कुंभार याची 10 मीटर एयर पिस्तुल खेळ प्रकारात उत्तर प्रदेश येथे होणार्‍या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल तन्मय कुंभार याचा प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश देसाई, प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. अनिकेत गायकवाड यांच्या हस्ते महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
तन्मय कुंभार हा बी. एस्सी भाग 1 मध्ये शिकत आहे. त्याने शिवाजी विद्यापीठस्तरीय 10 मीटर एअर पिस्तुल क्रिडा स्पर्धेत 370/400 असा स्कोअर करीत यश संपादन केले. त्याची दि. 12 ते 15 एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेशातील मेरठ येथे होणार्‍या ऑल इंडिया युनिर्व्हसिटीमध्ये होणार्र्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यास जिमखाना विभाग प्रमुख प्रा. अनिकेत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. यानिमित्ताने महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश देसाई यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. नरेंद्र फडतरे, प्रा. माणिक वांगीकर आदी उपस्थित होते.

COMMENTS