Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तानाजी विरकर ठरला नागोबा केसरीचा मानकरी; दिल्लीच्या बंटी कुमारला दाखवले आस्मान; शौकिनांची तोबा गर्दी

म्हसवड / वार्ताहर : नागोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेले जंगी कुस्त्यांचे मैदान नागोबा देवस्थान ट्रस्टच्या देखण्या नियोजनामुळे उत्साहात झाले.कुस्

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
कुस्ती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज : पैलवान संभाजीराव लोंढे
स्टेडियममध्ये महिलेकडून पोलिसाच्या कानाखाली !

म्हसवड / वार्ताहर : नागोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेले जंगी कुस्त्यांचे मैदान नागोबा देवस्थान ट्रस्टच्या देखण्या नियोजनामुळे उत्साहात झाले.
कुस्ती मैदानाचा प्रारंभ नागोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ईश्‍वरा खोत, उपाध्यक्ष वस्ताद विरकर, सचिव किसन जठरे, मधुकर सोकासने, तुळशीराम गोरड, जिजाबा खोत, तुकाराम विरकर आदीसह ट्रस्टच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीपळ वाढवून करण्यात आले. कुस्ती मैदानाला मामूशेठ विरकर, म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ, बबनशेठ विरकर, दादासाहेब दोरगे, माजी उपनगराध्यक्ष दिपक बनगर, अशोक राजगे, माजी नगरसेवक आप्पासाहेब विरकर, बाबासाहेब माने, डॉ. लक्ष्मण कोडलकर, विठ्ठल सजगाणे, हणमंत राखुंडे, दादा तांदळे, संजय विरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
श्री नागोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. तानाजी विरकर विरुध्द दिल्लीचा पै. बंटी कुमार यांच्यात कुस्ती रंगली होती. दोन्ही पैलवानाची ताकद समान पडत असल्याने प्रत्येक वेळी डाव प्रतिडाव करत दोंघाचाही बचाव उत्तम होता. परंतू क्षणार्धात पै. तानाजी विरकर याने मच्छी घोटा डावावर बंटी कुमार याला आस्मान दाखवित 51 हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. दोन नंबरसाठी खेळविण्यात आलेल्या कुस्तीमध्ये पै. धीरज पवारने पै. सुरज मुलाणी वरती हप्ती डावाच्या साह्याने विजय मिळवत 35 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. तृतीय क्रमांकाची कुस्ती कृष्णा नागवी यांनी जिंकून नागोबा केसरीचा मान पटकावला. त्याचबरोबर पै. महेश विरकर याने ही नेत्रदीपक कुस्ती करत तृतीय क्रमांकाचे 25 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. कुस्ती मैदनात प्रसाद पुकळे, धनाजी रूपनवर, राजाराम रुपनवर, अमोल विरकर, तुषार कडू, रोहीत विरकर, महादेव बाबर, वैभव गारळे, राहूल कोकरे, सूरज विरकर, सोनू गोरड, आप्पा तांदळे आदी पैलवानांच्या कुस्त्यां लक्षवेधी ठरल्या.
या मैदानात 100 रूपये ते 51 हजारापर्यंतच्या अनेक चटकदार कुस्त्या झाल्या. यावेळी या मैदानात अनेक मान्यवरांच्या सह परिसरातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा कुस्त्यांच्या फडाला परिसरासह सांगली, सातारा, कोल्हापूर, माळशिरस, आटपाडी येथील पैलवानांनी हजेरी लावत फडाची शोभा वाढवली.
मैदानात पंच म्हणून वस्ताद रावसाहेब कोळपे, मेजर मोहन विरकर, वस्ताद शिवाजी दिडवाघ, सत्यवान दिडवाघ, पोपट रुपनवर, श्रावण पडळकर, नवनाथ खांडेकर, दिलीप विरकर, हणमंत विरकर, बाळासाहेब काळे, बिरा गोरड, अरूण विरकर, विशाल सुपने, विलास रूपनवर, राघू विरकर, संतोष विरकर, बीरा गोरड, महावीर विरकर, किरण पोळ, पोपट मासाळ, मारूती दिडवाघ, दशरथ जाधव, संतोष विरकर, सदाशिव गोरड यांनी काम पाहिले.
कुस्त्यांचा फड यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी अध्यक्ष ईश्‍वरा खोत, प्रा. मोहन विरकर, महालिंग खांडेकर, नाना खांडेकर, विलास रुपनवर, राघू विरकर, तुकाराम विरकर, तुळशीराम गोरड, वस्ताद विरकर, किसन जठरे, मधुकर सोकसने, जिजाबा खोत, किसन ढम, बंडू विरकर, शंकर विरकर-खोत, बापू राखुंडे, दिपक जावीर, मधू करले, सूर्यकांत विरकर-खोत, सदाशिव गोरड, लुनेश खोत, धनाजी विरकर आदीसह ट्रस्टच्या सर्व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी झालेल्या कुस्त्यांचे निवेदन आटपाडीचे नामवंत निवेदक परशुराम पवार यांनी केले.

COMMENTS