छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज आहे यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल हे टाळण्यासाठी पर्य

छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज आहे यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल हे टाळण्यासाठी पर्यावरण पूर्वक वीज निर्मितीची गरज आहे यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर च्या वतीने आज रांजणगाव शेणपुंजी येथील रावते मंगल कार्यालयात ‘हर घर सोलर,घर घर उजाला,’ पंतप्रधान सूर्यघर योजने बाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. प्रशांत बंब होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी ग्रामपंचायतीने ‘हर घर सोलर घर घर उजाला’ हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतीचे अभिनंदन करून प्रत्येक कुटुंबाने आपल्या छतावर वीज निर्मितीसाठी सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन केले.
विजेच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.कुटुंबाच्या आर्थिक बचतीसाठी बँकेच्या सहकार्यातून ग्रामपंचायत मधील सर्व कुटुंबांनी आपल्या छतावर सोलर पॅनल बसून संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण व्हावा असे काम करावे यासाठी आमदार म्हणून जी काही मदत लागेल ती पूर्ण करीन, असे आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्ट केले.
सोलर पॅनल च्या माध्यमातून वीज निर्मिती साठी लागणारा खर्च बाबत वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता पवन कुमार कछोट यांनी मार्गदर्शन केले. यासाठी बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाबाबत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी संपूर्ण माहिती दिली.
आज कन्या दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामपंचायत मधील महिलांना आरोग्य कीटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले भुमी अभिलेख विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायतच्या वतीने यावेळी मान्यवरांच्या हस्ते पी आर कार्ड चे वाटप करण्यात आले सोलर पॅनल बसविण्यासाठी नोंदणीचे काम सुरू करण्यात आले.
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर चे संचालक दीपक बडे, ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता महालकर, उप सरपंच शिवराम ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्या उषा हिवाळे, दत्तू हिवाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, पोलीस अधीक्षक डॉ विनय कुमार राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर सुहास वाघचौरे, मेडाचे प्रतिनिधी शिरसाट, विस्तार अधिकारी पंचायत भारत घुगे, अशोक घोडके, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS