Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी कार्यवाही करा

आमदार आशुतोष काळे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर भागतील सर्वे नंबर 113 व 114 मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अ

भयंकर! तरुणाने गाडीतच स्वतःला घेतले पेटवून.
राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार : राणे
रुग्णसेवेचे पुण्यकार्य आनंदऋषीजी हॉस्पिटच्या माध्यमातून सुरू ः सुवालालजी बोथरा

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर भागतील सर्वे नंबर 113 व 114 मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अतिक्रमण नियमानुकुल होवून ती जागा त्या कुटुंबांच्या नावावर होण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगरच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा प्रश्‍न प्रलंबित होता.त्याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून  सर्वे नंबर 113 व 114 मधील लक्ष्मीनगर भागात अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबतचा प्रस्ताव कोपरगाव नगरपरिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला होता. यामध्ये लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून करणेबाबत सुधारित प्रस्ताव तयार करून त्यामधील रस्ता, रुंदी, खोली जागा, सुविधा क्षेत्र व भूखंड क्षेत्र या बाबीसाठी शिथिलता मिळण्याबाबत देखील विहीत मार्गाने सहाय्यक संचालक, नगर रचना अहमदनगर शाखा यांच्या लेखी अहवालानुसार सहसंचालक नगर रचना नाशिक विभाग यांच्याकडे दाखल केलेला होता.  दाखल केलेल्या या प्रस्तावाची छाननी करून पुढील कार्यवाहीसाठी संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे शिथिलता मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करून कोपरगाव नगरपरिषदेने रस्ता, रुंदी, खोली, जागा सुविधा क्षेत्र व भूखंड क्षेत्र याबाबत शिथिलतेचा अहवाल 21 फेब्रुवारी रोजी नगर रचना मूल्यनिर्धारण विभाग, पुणे यांच्याकडून कोपरगाव नगरपरिषद व नगर रचना अहमदनगर शाखा विभागाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्याबाबत पुढील उचित कार्यवाही तातडीने होणे गरजेचे आहे. जेणेकरून लक्ष्मीनगर मधील सर्वे नंबर 113 व 114 या भागातील शासकीय जागेवर वास्तव्यास कुटुंबांना त्या जागेचे सातबारा उतारे त्यांच्या नावावर होण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे.या कुटुंबांचे हे शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल होऊन शासनाच्या प्रचलित नियमानुसार ती जागा त्यांच्या नावावर होण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.

COMMENTS