Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘तारक मेहता’ दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर!

मुंबई प्रतिनिधी - छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' ही मालिका गेली १४ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत

वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी “या” करा उपाययोजना
आरक्षण हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न : शशिकांत तरंगे
’आट्टम’ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार

मुंबई प्रतिनिधी – छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली १४ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ बोहल्यावर चढणार आहे.सचिन श्रॉफ हा २५ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईमध्ये त्याचा लग्नसोहळा पार पडणार असून काही मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामध्ये कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्र परिवाराचा समावेश आहे. ‘सचिन श्रॉफ कोणत्या मुलीशी लग्न करतोय हे सिक्रेट ठेवण्यात आले आहे. सचिनचे कुटुंबीयांना सर्वकाही सुरळीत पार पाडवे असे वाटते त्यामुळे त्यांनी लग्नापूर्वी मुलीचे नाव समोर आणण्यास नकार दिला आहे. त्यांचे हे अरेंज मॅरेज आहे. मुलगी इंडस्ट्रीमधील नाही. ती एक इवेंट अरेंज करणारी आणि इंटेरिअर डिझायनर आहे. ती सचिनच्या बहिणीची मैत्रीण आहे. सचिनचा इतर कपल प्रमाणे प्रेम विवाह नाही. ते पहिल्यांदा एकमेकांना लग्नासाठी भेटले आणि आता ते लग्नगाठ बांधत आहेत.’ सचिनचा हा दुसरा विवाह आहे. त्याने जुही परमारशी लग्न केले होते. जवळपास नऊ वर्षे त्यांचा संसार सुरु होता. जानेवारी २०१८मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना १० वर्षांची मुलगी आहे. तिचे नाव समायरा आहे.

COMMENTS