Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदारांचे लाक्षणिक उपोषण

कराड / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोना काळात जे मोफत धान्य वाटप केलेल्या कामाचे अद्याप कमिशन मिळाले नाही. तेंव्हा शासनाने ते कमिशन त्वरीत द्य

शिरवडेत कृष्णा पात्रात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
शासकीय इमारतीच्या छताला लागली गळती; कर्जत पंचायत समितीच्या विभागातील अधिकारी, कर्मचारी त्रस्त
कोयना भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीतील वारसांना भूकंपग्रस्तांचे दाखले वाटप

कराड / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोना काळात जे मोफत धान्य वाटप केलेल्या कामाचे अद्याप कमिशन मिळाले नाही. तेंव्हा शासनाने ते कमिशन त्वरीत द्यावे अशी, मागणी सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी केली आहे. कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने आज एकदिवशीय लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
या उपोषणास बीड, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, मिरज येथील संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच काँग्रेसच्या विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी उपोषणस्थळी भेटून पाठिंबा जाहीर केला. या उपोषणात 285 दुकानदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे ः कोरोना कालावधीत संपुर्ण महाराष्ट्रातील रास्तभाव दुकानदारांनी मोफत धान्य वाटपाची व्यवस्था शासनाच्या नियमानुसार अखंड वाटप केले. त्या वाटपाचे आज अखेर राहिलेले कमिशन त्वरीत मिळावेत. ई-पॉस मशीनवर येणारे सर्व र्सव्हरच्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात. नवीन नियमानुसार ई-पॉस मशीनवर छऋड- व झचॠघ-ध या दोन योजनेचे दोन योजनेचे दोन वेळा अंगठा घ्यावा लागणार आहे. सध्याच्या नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे दुकानदार व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाटपास वेळ लागत आहे. मागील प्रमाणे दोनही धान्याचे वाटप एकाच अंगठ्यामध्ये व्हावे. सध्या शहर व शहरालगत धान्याची थेट वाहतूक चालू आहे ते धान्य खराब येत आहे ते चांगल्या दर्जाचे मिळावे. मशीनवर माल वाटपासाठी 5 तारखेपर्यंत त्वरीत उपलब्ध करुन मिळावा. ई-पॉस मशीनवरती टुजी नेटवर्कचे सिमकार्ड असून ते 4 जी किंवा 5 जी सुविधेमध्ये उपलब्ध करुन मिळावे. ज्या केशरी एपीएल कार्डधारकांना धान्य मिळत नाही. अशा कार्डधारकांना शासनाने धान्याचा पुरवठा करावा. स्वतः धान्य दुकानदार विमा संरक्षण मिळावे. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

COMMENTS