Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीच्या चारित्र्यावर संशय,म्हणून पोटच्या मुलीची हत्या करुन नंतर स्वत:ला संपवलं

मुंबई- मुंबईतील लालबाग भागात एका पिताने आपल्या 11 वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

काव्यप्रहार
पोलिस भरती चाचणीनंतर तरूणाचा मृत्यू
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा 

मुंबई- मुंबईतील लालबाग भागात एका पिताने आपल्या 11 वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भूपेश पवार (42) असे या मयत व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे चिट्ठी सापडली आहे. लालबागच्या गणेश गल्लीतील विमावाला महल इमारतीत राहणाऱ्या भूपेश ने घरात कोणी नसताना हे टोकाचे पाऊल घेतले. त्याने आधी आपल्या 11 वर्षाच्या मुलीला गळफास देऊन तिला मारून स्वतः गळफास घेतला. आत्महत्यांचे कारण पती पत्नीच्या झालेले वाद आहे. सकाळी भुपेशचा पत्नीसह वाद झाला होता. पत्नी कामावर गेल्यानंतर त्याने घरात कोणी नसताना मुलीला गळफास देऊन तिची हत्या केली. नंतर स्वतःने गळफास लावली. पत्नीने दुपारी फोन केला असता भूपेश ने फोन उचलला नाही. त्याची पत्नी घरी गेली तर तिला दार आतून बंद असल्याचे आढळले. बऱ्याच वेळ दार ठोठवल्यानंतर देखील दार उघडले नाही तर पत्नीने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

COMMENTS