पुणे/प्रतिनिधी ः शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदूम धर्म आणि संत व वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर रा
पुणे/प्रतिनिधी ः शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदूम धर्म आणि संत व वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी अंधारे यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, अखेर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदत घेत वारकरी संप्रदायांची माफी मागितली.
यावेळी बोलतांना अंधारे म्हणाल्या की, माझ्या वक्तव्यामुळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागते, असे म्हणत सुषमा अंधारेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय सूडबुद्धीतून माझा विरोध करण्यात येत असून यात भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचेच लोक आहेत, कोरोनाकाळात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध करणारे आचार्य तुषार भोसले आणि ह.भ.प. गणेश शेटे हेच होते. तेच आता मला विरोध करत असून जे लोक कधीच वारीत पायी चालले नाही, त्या लोकांनी कोरोनाकाळात स्टंट केला होता, असे सांगत सुषमा अंधारेंनी भाजपच्या वारकरी आघाडीवर सडकून टीका केली आहे. सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असल्यामुळे माझे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत. कबीरपंथीय असल्याने मी कुणाच्याही श्रद्धेच्या आड यायचे नाही, मी कर्मकांड न मानता चैतन्य मानते. तरीदेखील माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजपच्या वारकर्यांच्या गटाकडून सूडबुद्धीने विरोध केला जात असल्याची टीका अंधारेंनी केली आहे.
COMMENTS