Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्टेन स्वामींना गोवण्यासाठी संगणकात पेरले पुरावे

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण - अमेरिकेतील फॉरेन्सिक टीमचा अहवालातून स्पष्ट

पुणे/प्रतिनिधी ः कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांच्याशी संबंधीत एक नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी : जय हिंद फाउंडेशनची मागणी
केएल राहुल आशिया कपच्या दोन सामन्यांमधून बाहेर
चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या आरोपीस चोवीस तासात अटक 

पुणे/प्रतिनिधी ः कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांच्याशी संबंधीत एक नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अमेरिकी फॉरेन्सीक टीमने दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, फादर स्टेन स्वामी यांच्या कॉम्पुटरमध्ये आक्षेपार्ह असे जवळपास 44 कागदपत्रे ही हॅकरद्वारे प्लांट करण्यात आली होती, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे फादर स्टेन यांना सन 2020 मध्ये कथितरित्या दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.


आर्सेनल कन्सल्टिंग, स्टॅन स्वामीच्या वकिलांचे प्रतिनिधित्व करणारी उच्च फॉरेन्सिक टीम, म्हणते की कॉम्प्युटरचे डिजिटल फूटप्रिंट प्रथम स्पायवेअरने हॅक केले गेले. यानंतर हॅकरने जवळपास 44 फाईल्स कॉम्प्युटरमध्ये पेरल्या. स्वामी आणि माओवादी बंडखोर यांच्यात संबंध असल्याचे सिद्ध करणारे दस्तऐवज संगणक ड्राइव्हमध्ये ठेवण्यात आले होते, असेही अहवालात म्हटले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 2020 मध्ये आरोप केला होता की, स्टेन स्वामी यांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते आणि विशेषतः ते प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या संपर्कात होते. ऑक्टोबर 2020 पासून ते मुंबईच्या तळोजा कारागृहात होते आणि त्यांची प्रकृती सतत खालावत होती. त्यांना 8 ऑक्टोबर रोजी बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. एनआयएने स्टेन स्वामी यांना जामीन देण्यास विरोध केला होता. त्यांच्या तब्येतीचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे तपास यंत्रणेने म्हटले होते. ते माओवादी असून त्यांनी देशात अस्थिरता आणण्याचा कट रचला आहे. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हिंसाचाराच्या आधी एल्गार परिषदेची बैठक झाली होती, यादरम्यान स्टेन यांनी भडकाऊ भाषण केले. त्यामुळे हिंसाचार झाला, असे तपास संस्थांनी म्हटले होते.


कॉम्युटर हॅक करून पुरावे केले प्लांट- हल्लेखोराच्या मोडस ऑपरेंडीबाबत नवीन क्लू किंवा पुरावे मिळाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. आर्सेनलकडे 11 जून 2019 रोजी हल्लेखोराच्या हालचालींचे अनेक तपशील आहेत. पुणे पोलिसांनी संगणक जप्त करण्याच्या एक दिवस अगोदर हल्लेखोराने खोडा घालण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने नेटवायरचा वापर केला, जो आर्सेनलने रोखला. नेटवायर हे मालवेअरचे नाव आहे ज्याचा वापर हॅकर्सनी स्वामी यांच्या संगणकात घुसण्यासाठी केला आहे. स्वामी यांचे संगणक 20 जुलै 2017 रोजी पहिल्यांदा हॅक करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यानंतर 5 जून 2019 दरम्यान दोन मोहिमांमध्ये त्याच्या संगणकावर कागदपत्रे पाठवण्यात आली.

COMMENTS