Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा टिकणे काळाची गरज – हभप दीपक महाराज

अकोले/प्रतिनिधी - मातृभाषेतील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी  आज उच्च पदावर गेलेले आहेत.जि.प.प्रा.शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम असून तो टिकवण्यास

एकपात्री अभिनय स्पर्धेत श्रद्धा पुंडे व्दितीय
LokNews24 l पुण्यात बापाची दोन लेकींसह आत्महत्या
श्रीगोंदा शिवसेना युवासेनेची कार्यकारिणी जाहीर

अकोले/प्रतिनिधी – मातृभाषेतील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी  आज उच्च पदावर गेलेले आहेत.जि.प.प्रा.शाळेतील शिक्षणाचा दर्जा उत्तम असून तो टिकवण्यासाठी सर्वानी प्रयत्न केला पाहिजे. असे प्रतिपादन अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त ह.भ.प.दीपक महाराज देशमुख यांनी केले.


       जि.प.प्रा.शाळा,सुगाव खुर्द येथील शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  ह.भ.प.दीपक महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हभप देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच विष्णुपंत वैद्य हे होते. यावेळी सुगाव खुर्दचे सुपूत्र व पत्रकार अमोल वैद्य यांची मराठी पत्रकार परिषदेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक भारत पिंगळे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन वैद्य, उद्योजक डॉ.साहेबराव वैद्य, उपसरपंच डॉ.धनंजय वैद्य, दूध संस्थेचे संचालक शांताराम वैद्य, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वैद्य, लक्ष्मण वैद्य,सुयोग कर्पे,सचिन वैद्य,सीताराम गायके,अनिल पवार,धनंजय पवार, प्रभाकर रोहम, मुख्याध्यापक उल्हास एखंडे, नितीन नेहे,वनिता चौधरी, दिपाली क्षीरसागर ,विलास ढोले यांचेसह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.


यावेळी ह.भ.प.दीपक महाराज देशमुख म्हणाले की,विद्यार्थ्यांनी यश अपयशाची काळजी न करता सर्व परीक्षा दिल्या पाहिजेत. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही गृहपाठ दिला जातो. मात्र ग्रामीण भागातील पालकांना आपल्या पाल्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.राज्यातील आदर्श शाळेना भेट देण्याचा शालेय व्यवस्थापण समितीचा मनोदय चांगला असून त्याचा फायदा निश्‍चितच विद्यार्थ्यांना होईल असा विश्‍वास हभप देशमुख यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय मनोगतात विष्णुपंत वैद्य यांनी ही शाळा चावडीत भरत होती .आज ती सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वतःच्या इमारतीत भरत आहे, सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळत आहे.याचा आनंद वाटतो.उज्वल भवितव्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे असून या शाळेतून चांगले विद्यार्थी घडले आहेत,तीच परंपरा पुढे चालू ठेवावी असे मत व्यक्त केले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन वैद्य व तज्ञ सदस्य डॉ. साहेबराव वैद्य यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगत राज्यातील आदर्श शाळांना शिक्षक,व्यवस्थापन समिती व इच्छुक पालकांसमवेत  भेटी  देणार आहोत असे सांगितले. यावेळी पत्रकार अमोल वैद्य यांनी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या अनेक भूमिपुत्रांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.स ुगाव खुर्द च्या शैक्षणिक विकासाच्या परंपरेचा  आलेख यापुढील काळात सतत उंचावत जावो अशी अपेक्षा व्यक्त केली. आई ,वडील,शाळा,शिक्षक गाव,ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मुळे आपण  इथपर्यंत पोहचलो असल्याची  भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण वैद्य यांनी  केले तर आभार मुख्याध्यापक उल्हास एखंडे यांनी मानले. या शाळेतून एकूण 11विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते त्यापैकी पाच विद्यार्थी पात्र ठरले.सृष्टी सुयोग कर्पे, संस्कृती सचिन गायके, रिद्धी व सिद्धी सचिन वैद्य, संस्कार अनिल पवार यांचेसह  सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार करन्यात आला. या विद्यार्थ्यांना एखंडे यु.पी, नेहे, एन्. यु. ,  चौधरी व्ही.एन्.,क्षीरसागर डी.बी. ढोले व्ही.डी. यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS