Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सूरज रसाळ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष

आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ

जामखेड ः युवा कार्यकर्ते पै. सूरज रामभाऊ रसाळ यांची यूवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जामखेड तालूकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या न

स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील खाशाबा काळाच्या पदद्याआड. | फिल्मी मसाला | LokNews24 |
पारनेर : अधिकाऱ्याला मारहाण ! CCTV त कैद
डाँ.तनपुरे कारखान्याला गळीत हंगामाची परवानगी नसताना गुपचुप उरकला गळीत शुभारंभ

जामखेड ः युवा कार्यकर्ते पै. सूरज रामभाऊ रसाळ यांची यूवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जामखेड तालूकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवगाव येथील यूवक जिल्हा मेळाव्याच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिले. या निवडीने आ रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, यूवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, यूवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार अरूण मुंढे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ तसेच जामखेड तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी व दिघोळ ग्रामस्थानी सूरज रसाळ यांचे अभिनंदन केले. याचवेळी संतोष पप्पूसेठ धुमाळ यांची कर्जत तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सूरज रसाळ हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. सर्वपरिचित असलेले माजी सरपंच तथा तंटामुक्तीचे अध्यक्ष कै. रामभाऊ रसाळ यांचे ते चिरंजीव आहेत. सूरज रसाळ यांनी भाजपा विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सहा वर्षे काम पाहिले. त्यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. सध्या दिघोळचे तंटामुक्ती अध्यक्ष धीरज रसाळ यांचे ते बंधू आहेत. रसाळ बंधू सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमात पंचक्रोशीमध्ये सक्रिय सहभाग घेतात. आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी विश्‍वासाने पार पाडू असे नवनियुक्त यूवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूकाध्यक्ष पै सूरज रसाळ यांनी सांगितले.

COMMENTS