Homeताज्या बातम्यादेश

सुनील केदार यांना सर्वोच्च दिलासा नाहीच

शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली ः काँगे्रस नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी सुनावण्यात आलेल्या 5 वर्षांच्या शिक्षेविर

जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी : सुनील केदार
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे शनिदर्शन
सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली ः काँगे्रस नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी सुनावण्यात आलेल्या 5 वर्षांच्या शिक्षेविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यामुळे केदार यांना दिलासा मिळतांना दिसून येत नाही. सुनील केदार यांनी आपल्या दोषसिद्धीला अंतरिम स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती सूर्यकांत व के व्ही विश्‍वनाथन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास साफ नकार दिला. यामुळे सुनील केदार यांची घोर निराशा झाली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी जिल्हा न्यायालयाला केदार यांच्या याचिकेवर सप्टेंबर अखेरपर्यंत निर्णय देण्याचेही निर्देश दिलेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी केदार यांना दिलासा मिळतो का? हे पाहावे लागणार आहे.

COMMENTS