Homeताज्या बातम्याक्रीडा

सुनील गावसकरांनी घेतला धोनीचा ऍटोग्राफ

स्टेडियममधील प्रेक्षकांनी, टीव्हीवर पाहणाऱ्या लोकांनी आयपीएल 2023 मध्ये 14 मे 2023 रोजी खास क्षण पाहिला. असा क्षण जो प्रत्येक क्रिकेटप्रेमीला सार

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू तुषार देशपांडेचा झाला साखरपुडा
लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर कबड्डी स्पर्धांचा शुभारंभ
इस्लामपूर येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

स्टेडियममधील प्रेक्षकांनी, टीव्हीवर पाहणाऱ्या लोकांनी आयपीएल 2023 मध्ये 14 मे 2023 रोजी खास क्षण पाहिला. असा क्षण जो प्रत्येक क्रिकेटप्रेमीला सारखा पाहतच राहावासा वाटेल. एक दिग्गज क्रिकेटर दुसऱ्या महान क्रिकेटरचा ऑटोग्राफ घेतोय, एकमेकांना कडाडून मिठी मारतोय आणि त्या क्षणाचे सर्वजण साक्षीदार झाले. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा महान कप्तान महेंद्रसिंह धोनीने सर्वांनाच धक्कादायक संकेत दिला. त्याने या संकेतामधून ‘ही माझी शेवटची आयपीएल’ असल्याचे समोर आणले.

यंदाच्या आयपीएलध्ये चेन्नई सुपर किंग्जने चेपॉकच्या मैदानावर प्लेऑफपूर्वीचा शेवटचा सामना खेळला. आता 23 मेला क्वालिफायर-1 चा सामना या मैदानावर होणार आहे, पण यावेळी चेन्नई सुपर किंग्ज खेळणार का याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शेवटची आयपीएल खेळणाऱ्या धोनीसाठी हा सामना भावनिक होता. या सामन्यात चेन्नईला कोलकाताकडून 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. सामन्यानंतर धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्टेडियममध्ये गोल फिरून चाहत्यांनी जर्सी, ऑटोग्राफ केलेले बॉल दिले.

COMMENTS