Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’उसगावचा संतमहिमा’ लिहिणारे सुखदेव सुकळे संतवृत्तीचेच ः प्राचार्य डॉ. टेमकर

श्रीरामपूर ः संत हे काळाच्या पुढे असतात, त्यामुळेच संतसाहित्य हे मनामनात आणि जगात अजरामर आहे. या वाटेवर साहित्यिक सुखदेव सुकळे यांनी संपादित केले

परदेशातून आलेल्या दहाजणांचा शोध सुरू…पाचजण सापडले
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला दुष्काळग्रस्तांशी संवाद
मुंबईतील चर्चेत धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच

श्रीरामपूर ः संत हे काळाच्या पुढे असतात, त्यामुळेच संतसाहित्य हे मनामनात आणि जगात अजरामर आहे. या वाटेवर साहित्यिक सुखदेव सुकळे यांनी संपादित केलेला ’उसगावचा संतमहिमा ’आणि त्यांनी लिहिलेले ’साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज’ चरित्र म्हणजे भक्ती आणि नीतीची साक्ष असून साहित्यिक सुखदेव सुकळे हे संतवृत्तीचेच  असल्यानेच त्यांच्या हातून अनेक प्रबोधक साहित्यनिर्मिती झाली असल्याचे गौरव उदगार आदिनाथनगरचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी काढले.
   श्रीरामपूर येथील बोरावकेनगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान कार्यालयात प्राचार्य डॉ. टेमकर आणि मित्रपरिवाराने स्व.सौ.पुष्पा सुकळे पुस्तकालय आणि प्रतिष्ठानकार्य यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.सुखदेव सुकळे यांनी प्राचार्य डॉ. टेमकर आणि त्यांच्या सहकार्‍यांचा शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार केले. संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले आदिंनी कार्यक्रमाचे नियोजन केले.सुखदेव सुकळे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या 30जानेवारी2018रोजी विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. शासन रजिस्टर्ड असलेल्या या प्रतिष्ठानने अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष प्राचार्य टी. ई. शेळके,उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, सुदामराव औताडे पाटील आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी अनेक सेवाभावी उपक्रम राबविले, वाचनालय आणि विविध पुरस्कार सुरु केले,विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या वाटप,निराधार आणि गरजूंना सहकार्य केले जात असल्याची माहिती दिली. प्राचार्य डॉ. टेमकर यांनी सुकळे यांच्या सेवाकार्याचे कौतुक करून म्हणाले स्व. अड, रावसाहेब शिंदे हे ज्ञानसूर्य होते,त्यांच्यामुळेच राजळे परिवाराने मला सेवेची संधी दिली,अड, रावसाहेब शिंदे यांचे विचार, कार्य पुढे नेणारे सुकळेसर कृतज्ञतेचे आदर्श आहेत.हा  सेवाशील आदर्श प्रतिष्ठान जपत आहे, हे विशेष प्रेरणादायी आहे. तसेच संतसाहित्य, आदर्श डॉक्टर,सेवाशील व्यक्तिमत्व पुरस्कार दिले जातात ही मोठी समाजसेवा आहे,असे सांगून प्रतिष्ठानला सहकार्य करू असे आश्‍वासन दिले.यावेळी कृष्णा टेमकर यांनीही प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.

COMMENTS