Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सुवर्ण पदकाने सुजित देशमुख सन्मानीत

मसूर / वार्ताहर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 23 वा दीक्षांत समारंभ झाला. या समारंभात कराड येथील सुजित सतीश देशमुख यांना कृषी हवाम

यंदा पाऊस 106 टक्के पाऊस कोसळणार
पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढावे : ना. शंभूराज देसाई
Yeola : स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात गांडूळ संवर्धनावर मार्गदर्शन

मसूर / वार्ताहर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 23 वा दीक्षांत समारंभ झाला. या समारंभात कराड येथील सुजित सतीश देशमुख यांना कृषी हवामाशास्त्र या विषयात विद्यापीठाचे सुवर्णपदक व गुणानुक्रमे सर्वप्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास दिला जाणारा रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, कृषी चयन मंडळाचे माजी अध्यक्ष चारुदत्त मायी, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, आ. राहुल पाटील उपस्थित होते.
सुजित हा हेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सतीश देशमुख यांचा मुलगा असून सद्या तो महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे येथे पीएच. डी पुर्ण करत आहे.

COMMENTS