Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

मुंबई प्रतिनिधी - मुंबई घाटकोपर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी केली आत्महत्या केली

सुदानमध्ये ’ऑपरेशन कावेरी’ सुरू
भारतीय नरहरी सेनेच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी रविशेठ माळवे
वीज पुरवठा खंडित करण्याच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

मुंबई प्रतिनिधी – मुंबई घाटकोपर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी केली आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेनखाली येत त्यांनी आपले आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. सुधीर मोरे यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असावे? असा प्रश्न आता उपस्थित होत असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. कुर्ला रेल्वे  पोलीस ठाण्यात याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS