Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निशा चव्हाण यांना मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान

पुणे ः भिडे वाडा आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा कायदेशीर लढा यशस्वी केल्याबद्दल महिला दिनाच्या पूर्व संध्येला पुणे महापालिका विधी सल्ला

प्रेयसीसाठी 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोळीबार.
सरकार आणि न्यायपालिका ! 
शिंदे गटाकडून शिवधनुष्य यात्रा

पुणे ः भिडे वाडा आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा कायदेशीर लढा यशस्वी केल्याबद्दल महिला दिनाच्या पूर्व संध्येला पुणे महापालिका विधी सल्लागार निशा चव्हाण यांना मातंग एकता आंदोलन महिला आघाडीच्या वतीने माजी मंत्री रमेश बागवे व जैनब बागावे यांच्या हस्ते मुक्ता साळवे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिला भगिनींचा सन्मान मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या पुणे शहर महिला आघाडी व क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. माता जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व कर्तृत्ववान महिला भगिनींचा राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते आरोग्य सेवेबद्दल डॉ- माधुरी रोकडे (सोनवणे हॉस्पिटल प्रसृतिगृह रुग्णालयप्रमुख) अस्मिता तांबे धुमाळ (सहाय्यक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय तथा प्रशासक अधिकारी कर संकलन विभाग पुणे म.न.पा) एस तोटेवार (ए,पी,आय खडक पोलीस स्टेशन ) या महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला.

COMMENTS