Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड तालुक्यात तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

बीड प्रतिनिधी - तरुण शेतकर्‍याने आर्थिक विवंचनेला कंटाळून विषारी द्रव्ये प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना चिंचोली माळी ( ता. बीड ) येथे आज गु

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या
लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.
मुलांना विष देत जोडप्याची आत्महत्या

बीड प्रतिनिधी – तरुण शेतकर्‍याने आर्थिक विवंचनेला कंटाळून विषारी द्रव्ये प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना चिंचोली माळी ( ता. बीड ) येथे आज गुरुवारी ( दि. 13 ) दुपारी घडली.या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
व्दारकादास भगवान काळे ( वय 25 वर्ष ) रा. चिंचोली माळी ( ता. बीड ) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. रविवारी ( दि. 9 ) रात्री घरातच विषारी द्रव्ये प्राशन केले. हा प्रकार कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रविवार पासून त्याच्यावर बीड येथे उपचार सुरू होते. आज गुरुवारी (दि.13 ) अखेर द्वारकादास काळे याची मृत्यूशी असलेली झुंज संपली असून दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. मागील वर्षी हाती काहीच पडले नाही. यावर्षी पावसाचे असेतसे दिसत असल्याने आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मयत द्वारकादास यांच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.

COMMENTS