Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहरे येथे तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

शिराळा / प्रतिनिधी : मोहरे येथील तरुणाने राहत्या घरात दुसर्‍या मजल्यावरील स्लॅबला असणार्‍या हुकास दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडक

युवा नेते प्रतीक पाटील यांच्या लग्नाची जय्यत तयारी
पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान शहीद | LOKNews24
महाराजस्व अभियानांतर्गत डिस्कळमध्ये 374 शिधापत्रिकांचे वाटप

शिराळा / प्रतिनिधी : मोहरे येथील तरुणाने राहत्या घरात दुसर्‍या मजल्यावरील स्लॅबला असणार्‍या हुकास दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी कोकरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोहरे, ता. शिराळा येथील रविराज तुकारम पाटील (वय 45) या तरुणाने अज्ञात कारणाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 7 वाजण्या पुर्वी उघडकीस आली. याबाबतची फिर्याद वसंत बाबुराव पाटील (वय 62) यांनी या घटनेची माहिती कोकरुड पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असुन पुढील तपास सपोनि ज्ञानदेव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पो. ना. तांबेवाघ करत आहेत.

COMMENTS