Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रवरा स्कूलचे यश

लोणी ः श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या ’हिंदी दिवस’ निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्

दरडगाव थडी मायराणीतील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
दोन वेगवेगळ्या अपघाता तिघांचा मृत्यू
आझादी का अमृत महोत्सव निमित्त कायदेविषयक जनजागृती रॅलीचे उद्घाटन

लोणी ः श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या ’हिंदी दिवस’ निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणी च्या इयत्ता नववी च्या दोन विद्यार्थिनी कु. श्रद्धा लहामगे आणि कु. अंजली मिश्रा यांनी प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले अशी माहीती प्राचार्या रेखा रत्नपारखी यांनी दिली.
हिंदी दिनानिमित्त घेण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील एकूण 16  शाळेतील 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अंजली मिश्रा हिने गट अ मधील शायरी के सरताज-गुलजार’ आणि श्रद्धा लहामगे हिने गट ’ब’ मधील’ दुर्लभ मनुष्य जन्म है,मिलेना बारंबर’या विषयावर अत्यंत प्रभावी शब्दातही वक्तृत्व सादर करून रोख 1000 रू. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळवले. या यशस्वी विद्यार्थिनीचे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त कार्यकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे, शिक्षण समन्वयक नंदकुमार दळे व विद्यालयाच्या प्राचार्या, रेखा रत्नपारखी यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयाच्या हिंदी शिक्षिका शेख  एस. आर. यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS