Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत दोन मुलींना शोधण्यात यश

लातूर प्रतिनिधी - एक वर्षा पेक्षा जास्त कालावधीपासून बेपत्ता असलेल्या आणखीन 2 मुलींना शोधण्यात यश आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे य

प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्या-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाचा प्रारंभ; मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रयतच्या शाळांतून एआय तंत्रज्ञान शिकविणार : खा. शरद पवार

लातूर प्रतिनिधी – एक वर्षा पेक्षा जास्त कालावधीपासून बेपत्ता असलेल्या आणखीन 2 मुलींना शोधण्यात यश आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (एएचटीयू) ऑपरेशन मुस्कान अंतर्गत केली आहे. 2022 मध्ये पोलीस ठाणे अहमदपूर व औसा येथे अल्पवयीन मुलीचा अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अनुक्रमे दोन अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यापासून अहमदपूर व औसा पोलीस स्टेशनचे पोलीस नमूद मुलींचा शोध घेत होते परंतु त्या मिळून येत नव्हत्या. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी ब-याच कालावधीपासून तपासावर असलेले व आतापर्यंत मिळून न आलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला (एएचटीयू) आदेशित करून सूचना व मार्गदर्शन करून ऑपरेशन मुस्कान राबविण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी हे त्यांच्या पथकामार्फत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना अपहरण झालेल्या मुलीचा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन शोध घेतला. तसेच सायबर सेलच्या मदतीने मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून पुणे व कर्नाटक राज्याच्या सीमालगत गावात सदर मुलींचा शोध घेऊन त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीसह पोलिस ठाणे अहमदपूर व औसा येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी पोहेका योगी, मापोना सुदामती वंगे, गिरी, चालक बुढे, सायबर सेल यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

COMMENTS