Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंदोलन करताच बसस्थानका समोरील परिसर झाला दुर्गंधीमुक्त

लातूर प्रतिनिधी - गेल्या अनेक दिवसांपासुन बसस्थानक समोरील मेन रोड परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. या बाबत परिसरातील नागरिकांनी या बाबत मनपा

मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर
जिल्ह्यातील 2 हजार 620 महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी

लातूर प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासुन बसस्थानक समोरील मेन रोड परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. या बाबत परिसरातील नागरिकांनी या बाबत मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. या बाबत प्रभुराज प्रतिष्ठान व सामाजिक नागरिकांनी घाणीच्या परिरात हातात बोलके फलक घेऊन मनपा प्रशासनाचे निषेध व्यक्त करत मनपा प्रशासणाचे लक्ष वेधले याची दखल घेत परिसर स्वच्छ कारण्याचे काम जोमात चालू केले.
प्रभुराज प्रतिष्ठान व समाजिक नागरिक यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून या बाबत मनपा प्राशासनाचे आभार मानले. यावेळी प्रभुराज प्रतिष्ठाणचे अ‍ॅड. अजय कलशेट्टी, अ‍ॅड. शिरीष दहीवाल, शिरीष माळी, विक्रमी रक्तदाते पारस चापसी, विलास भुमकर, मोतिराम कदम, शेख हुसेन, अशोक पंचाक्षरी, शिवा धुळे, मुन्ना बट्टेवार, सचिन गोलावार, नितीन बावगे, परिरातील रिक्षा चालक लक्ष्मण भिसे, शेख फतरिु्मया, वाल्मिक गादाडे, चनबस धुळे, नितीन वाघमारे, दत्ता जोगदंड, रसूल शेख, बालाजी कांबळे आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

COMMENTS