Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहंकारी लोकप्रतिनिधींना मतदारांनी जागा दाखवावी

जवळा (बु) वार्ताहर - राजकारण हे समाज परीवर्तनांचे साधन आह. निवडुन आलेल्या व्यक्तींने प्रभावीपणे समाजांचे प्रश्न सोडविण्यांची आवश्कता आहे. निवडून

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे सहकार पॅनलचे व्यापारी मतदारसंघातून दोघे उमेदवार विजयी
टोलनाका तोडफोड प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक
शेतकर्‍यांनी शांततेत वहीवाट काढून द्यावी

जवळा (बु) वार्ताहर – राजकारण हे समाज परीवर्तनांचे साधन आह. निवडुन आलेल्या व्यक्तींने प्रभावीपणे समाजांचे प्रश्न सोडविण्यांची आवश्कता आहे. निवडून आलेली व्यक्ती जर अहंकारी वागत असेल तर त्यांना मतदानांच्या माध्यमांतुन जनतेने त्यांची जागा दाखवली पाहिजे. यासाठी राज्यकर्त्यांनी आपल्या कामांचे सिंहवलोकन करावे. हा आदर्श लोकनेते.विलासराव देशमुख व स्व .वसंतराव काळे यांनी घालून दिला आहे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर तालुक्यातील काळे बोरगांव येथे शिक्षक आमदार विक्रम काळे व लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती व उपसभापती व संचालक मंडळाच्या आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. मंचावर शिक्षक आमदार विक्रम काळे, लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक भिसे ,आबासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, मारूती महाराज कारखाण्यांचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, काळे बोरगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सतीश काळे, डॉ.कैलास काळे, प्रा. अंकुश नाडे, सरपंच अनिता काळे,उपसरपंच छाया देशमुख ,लतिका देशमुख यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, विक्रम काळे यांचा त्यांच्याच गावामध्ये सत्कार होत आहे. ही आनंदाची बाब आहे. विक्रम काळे केवळ सभागृहामध्ये शिक्षकांचे प्रश्न मांडत नाहीत तर ते शेतक-याचेही प्रश्न अतिशय आक्रमकपणे मांडतात. 8 जिल्ह्याचा मतदारसंघ असलेला हा शिक्षक मतदारसंघ अवघड आहे. या मतदारसंघात चार वेळा विजय होण्याचा विक्रम आमदार विक्रम काळे यांनी केला आहे हे अभिनंदनीय आहे. या ठिकाणी माझ्या हस्ते सभापती जगदीश बावणे व उपसंभापती सुनील पडले व सर्व विजयी संचालक मंडळाचा सत्कार झाला याचाही मनस्वी आनंद झाला असल्यांचे सांगुन लातूर ची कृषी उत्पन्न बाजार समिती सुपर मार्केट आहे आणि या सुपर मार्केटचा पारदर्शी कारभार हे सर्व विजयी उमेदवार निश्चीतपणे करतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी शिक्षक आमदार वक्रिम काळे यांनी आपल्या मनोगत मध्ये माझा सत्कार माझ्या गावांमध्ये होत आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. या सत्कार कार्यक्रमात शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह नूत सभापती जगदीश बावणे ,उपसभापती सुनील पाटील व संचालक मंडळाचे स्वागत ग्रामस्थांच्या वतीने प्रशांत देशमुख, बबनदादा काळे, गणी सय्यद ,रमेश देशमुख , भारत आदमाने, बाबासाहेब भिसे,बंडू घोडके ,बाबासाहेब पाटील , नवनाथ काळे , दिपक काळे,बापू शिंदे, सतीश देशमुख ,रमेश मोरे ,नागोराव सावंत, सद्धिाप्पा कलुरे, सुरेश आदमाने,हनुमंत काळे, रंगनाथ माने, अण्णासाहेब काळे, रमाकांत आदमाने,चंद्रकांत पिंपरे ,मेहनतीन सय्यद ,भगवानराव देशमुख विलास वाघमारे, भागवत आदमाने, सागर काळे प्रतीक देशमुख, रत्नदीप काळे,सार्थक काळे ,निखिल सावंत ,अविनाश मगर,आशिष मगर आदीसह काळे बोरगाव येथील विविध संस्थेच्या पदाधिका-यांंनी केले. यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, सभापती जगदिश बावणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन सतीश काळे यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार दत्तप्रसाद बनाळे यांनी केले तर आभार डॉ.कैलास काळे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी काळे बोरगाव, निवळी, शिराळा,चिंचोली (ब ) जवळा (बु ) रामेगाव ,गुंपावाडी येथील नागरिक उपस्थित होते.

COMMENTS