पाथर्डी ः विद्यार्थी व समाजातील सर्वच घटकांसाठी महाराष्ट्र शासन व महसूल विभाग अनेक लोकाभिमुख योजना राबवत असते,त्याचाच एक भाग म्हणून महसूल मंत्री ना.
पाथर्डी ः विद्यार्थी व समाजातील सर्वच घटकांसाठी महाराष्ट्र शासन व महसूल विभाग अनेक लोकाभिमुख योजना राबवत असते,त्याचाच एक भाग म्हणून महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांची वर्षभर सेतूकेंद्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील निवडक 14 महाविद्यालयांना सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या सेतू सुविधा केंद्राचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले.ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या सेतू सुविधा केंद्र उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ बबन चौरे, अजय रक्ताटे, सुरेश वाघ, दादासाहेब कंठाळी, खाडे गुरुजी आदी उपस्थित होते.
प्रसाद मते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, डोमेसाइल (अधिवास) प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी (ईडब्ल्यूएस), इ.अनेक प्रमाणपत्र, दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालक सेतू सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्रात गर्दी करतात. ही गर्दी टाळण्यासाठी महाविद्यालयात माफक दारात वरील दाखले मिळण्याची सोय करण्यात आली आहे. या सुविधा केंद्राचा लाभ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच तालुक्यातील इतर विद्यार्थ्यानाही होणार आहे. बाबुजी आव्हाड महाविद्यालय नेहमीच शासनास सहकार्य करत आले आहे म्हणून हे सुविधा केंद्रही पूर्ण क्षमतेने चालेल व विद्यार्थ्यांना सेवा पुरवेल असे ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ बबन चौरे, सुत्रसंचालन डॉ अभिमन्यू ढोरमारे तर आभार डॉ अर्जुन केरकळ यांनी मानले.
COMMENTS