विद्यार्थ्यानी बळी पडू नये

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विद्यार्थ्यानी बळी पडू नये

देशात शालेय अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. हा आर

मुदतपूर्व चाळवाचाळव  
चीनमधील निर्बंध आणि कोरोना उद्रेक
कोणता झेंडा घेऊ हाती ?

देशात शालेय अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. हा आरोप त्यांनी केला तो भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसवर. तो तसा खराच. पण भाजप सत्तेत येण्याअगोदर शालेय अभ्यासातून विद्यार्थ्यांवर धार्मिक संस्कार केले जात नव्हते का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असतांना सुद्धा ते तसे होत होते. तेव्हा शरद पवार हरभरे खात होते की गोट्या खेळात होते. किंबहुना शरद पवारांनी कधी जातीधर्माचे राजकारणच केले नाही का? राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार, मंत्री तपासले तर ते अपवाद वगळता एकाच जातीचे नाहीत काय? सर्वात महत्वाचे म्हणजे ‘राष्ट्रवादी’ म्हणजे काय? जो राष्ट्रवादी असतो तो धर्मवादी नव्हे काय? मार्क्स, लेनिन आणि स्टालिन या तिघांनीही अशी सैद्धांतिक भूमिका घेतली की, राष्ट्रवाद व भांडवलशाही समाजव्यवस्था ही एकाच संस्थेची दोन रूपे आहेत. आता ही राष्ट्रवाद संकल्पना आपल्या घटनाकारांना मान्य नव्हती. तेव्हा, राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद आणि भाजप किंवा आरएसएसचा राष्ट्रवाद यांच्यात काय फरक? त्यामुळे आता भाजप अभ्यासक्रमामधून विध्यार्थ्यांच्या मनात विष पेरत आहे असे म्हणणे म्हणजे दातांशिवाय ऊस सोलणे होय. आणि ते पवारांना उत्तम प्रकारे जमतं. कारण, ते जाणते राजे आहेत. याची त्यांना जाण असणारच. पण ते आभासी जाणते राजे आहेत हे कुणाला कळतंय?

देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. असं सुद्धा पवार म्हणाले. ते योग्यच. पण ते फक्त राजकारणापुरतेच का? पवार जे महाविकास आघाडीचे सरकार चालवत आहेत त्या पक्षात हिंदू कट्टरवादी शिवसेना पक्ष आहे. आता त्याचे काय? दुसरे असे की, या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे तर त्याचा अजेंडा काय आहे? किंबहुना त्याचा कृतिकार्यक्रम पवारांकडे काय आहे? लढणार कसं हे तर सांगितले पाहिजे. का नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. आरएसएसकडे जसा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तसा राष्ट्रवादीकडे काय आहे? का दोघांचा कार्यक्रम एकच आहे? हे शरद पवार यांनी सांगितले पाहिजे. पण ते तसे कधीच सांगणार नाहीत हे नक्की. त्यांनी ते सांगितले तर त्यांचे सर्व बिंग फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण शरद पवारांच्या वरील विधानात विसंगतीत संगती आहे.

आता आपल्या देशाचे चहा विकणारे महाज्ञानी पंतप्रधान ‘परीक्षे पे चर्चा’ कार्यक्रमात म्हणाले की, मुलगा-मुलगी असा भेद करू नका, मुलींचे सामर्थ्य जाणून घेण्यात समाज मागे राहिला, तर तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही. हेही खरे. पण मुलीला दुय्यम स्थान कुणी दिले? हे तर सांगा? स्वतःच्या पत्नीला वाऱ्यावर सोडून देशाच्या सर्वोच पदावरून बसून नुसत्या फुसक्या सोडायच्या हे काय लोकांच्या लक्षात येत नाही का? ‘मुलींचे सामर्थ्य जाणून घेण्यात समाज मागे राहिला, तर तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही’. हे मोदींचे विधान नुसते खरे नसून १०१ टक्के खरे आहे. पण, ज्या व्यवस्थेने मुलींचे अधिकार नाकारले, तिला अबला केले, स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, ती शूद्र आहे असे सारे नियम ज्या धर्म व्यवस्थेने स्त्रीयांवर लादले त्या धर्मव्यव्यवस्थेची चिकित्सा करून मोदींनी बोलले पाहिजे. तसे मोदी बोलतही नाहीत आणि वागतही नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात पक्षीय विसंगती असली तरी मैत्रीय संगती आहे. भाजप द काश्मीर फाईल चित्रपटाच्या माध्यमातून गैरप्रचार आणि गैरसमज निर्माण करत आहे. यामुळे संपूर्ण देशात विषारी वातावरण निर्माण होत आहे, शालेय अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींचा जोर वाढतोय या शरद पवार यांच्या विधानावर द काश्मीर फाईल चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी टिका केली आहे. शरद पवार ढोंगी आहेत असे विधान विवेक अग्निहोत्री यांनी केले. मग हा ढोंगीपणा नेमका कोणता? आणि त्याचे मूळ कशात आहे? यावर अग्निहोत्रीने अधिकच उहापोह केला नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाला सुद्धा ढोंगीपणाची जोड आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. देशातील सर्वच पक्षाचे राजकारण हे जात आणि धर्मावर आधारित आहे. तशी धार्मिक मूल्यव्यवस्था सुद्धा आपल्याकडे असल्यामुळे हजारो वर्ष इथे ज्ञानाचे कवाडे सर्वांसाठी बंद होती. त्यामुळे इथे सर्वजण धर्माचे गुलाम होते आणि आजही आहेत. त्याला मोदी किंवा पवारही अपवाद नाहीत.या देशात महात्मा जोतीराव फुले यांनी सर्वप्रथम समाजाला शिक्षणाचे दरवाजे खुले केली आहेत. त्यामुळेच तर अल्पसंख्यांक समाजातील विशेषतः तेली जातीतील मोदी इथे पंतप्रधान होऊ शकले आहेत. एक दलित राष्ट्रपती रामनाथ कोविंद फुले यांच्या शिक्षण क्रांतीमुळेच पदावर आहेत. आता पवार वर्णव्यवस्थेमधील कोणत्या इमल्यावरचे आहेत हे सांगायची गरज नाही. पण देशातील सर्व विध्यार्थ्यानी हे लक्षात घ्यावे की, आपण विध्यार्थी दशेत फक्त शिकण्याचे कार्य करावे. पवार- मोदी यांच्या राजकारणाकडे किंबहुना धर्माकडेही दुर्लक्ष करणे यातच हित आहे. विध्यार्थी आणि धर्म याची सांगड सर्वच पक्ष आपल्या पक्षाच्या विध्यार्थी संघटनेतून घालत असतात. त्याला विध्यार्थ्यानी बळी पडू नये. 

COMMENTS