Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा  : डॉ. दुकळे

शेवगाव :  कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्

पोलीस उपायुक्त कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार
बेकायदेशीर वाहनांवर परिवहन विभागाचा दणका
‘न्यू आर्ट्स’मध्ये मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबीर 

शेवगाव :  कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा फाउंडेशन डे  मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. दुकळे पी.ए. यांनी विद्यापीठाच्या स्थापनेचा इतिहास, उद्दिष्टे व वाटचाल यावर सविस्तर प्रकाश टाकला. “विद्यापीठाची स्थापना केवळ पदव्या देण्यासाठी नव्हे, तर समाजाला संस्कृत, सक्षम आणि जबाबदार नागरिक देण्यासाठी झाली आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. विद्यापीठाने शिक्षणासोबतच संशोधन, नवोपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञानसंपन्न व आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकिता बोरुडे यांनी केले. प्रस्तावना प्रा. दिपाली गरड आभार प्रा. अमोल खोसे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच निमंत्रित पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS