Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरुडी आश्रमशाळेच्या विद्यार्थींनीची सीमेवरील जवानांना राखीची स्नेह भेट

सुरुडी/आष्टी प्रतिनिधी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,सुरुडी ता.आष्टी, जि.बीड येथ

उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली
 राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

सुरुडी/आष्टी प्रतिनिधी – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,सुरुडी ता.आष्टी, जि.बीड येथे देशात साजरा होणारा रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने मा.प्रकल्प अधिकारी श्रीमती बोकडे मॅडम यांच्या प्रेरणेने शाळेचे मुमुख्याध्याप एस.पी.राठोड  यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थींनीनी देशाचे रक्षण करत असलेल्या जम्मू आणि काश्मीर येथील पांजपीर, राजौरी जिल्ह्यातील सीमेवरील जवानांसाठी (सैनिकांसाठी) मायेचा धागा म्हणजेच राख्या बनवण्यात आल्या.या राख्या अतिशय सुबक व सुंदर पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत.यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तसेच देशासाठी सीमेवर रात्रंदिवस ऊन, वारा, पाऊस झेलत देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता, देश प्रेमाची भावना तसेच सैनिकांबद्दल आदर निर्माण होतो, असे शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सरांनी सांगितले. या उपक्रमासाठी शाळेचे कृतिशील व उपक्रमशील शिक्षक  केतन काकडे व  संगीता जाधव  यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमांसाठी सर्व विद्यार्थिनींनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला व सर्व कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS