Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी मंत्री धनंजय मुंडेंसह 22 जणांची निर्दोष मुक्तता !

केजच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

केज प्रतिनिधी - केज -धारूर पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून 12 मार्च 2008 रोजी तेलगाव येथे दोन गटात हाणामारी होऊन पोलिसांवर दगडफेक करीत शासकीय क

ईडीची राज्यभरात छापेमारी
औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केवळ शहरापुरतेच
अहमदनगर जिल्ह्यात दोन कोटींची वीज चोरी पकडली

केज प्रतिनिधी – केज -धारूर पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून 12 मार्च 2008 रोजी तेलगाव येथे दोन गटात हाणामारी होऊन पोलिसांवर दगडफेक करीत शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यातून कृषीमंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, राजाभाऊ मुंडे यांच्यासह 22 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचा निकाल केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुणाल जाधव यांनी सोमवारी (दि. 28) दिला. धारूर येथील पंचायत समितीच्या सभापती – उपसभापती निवडीवरून 12 मार्च 2008 रोजी तेलगाव (ता. धारूर) येथे दोन गटात हाणामारी झाली होती. यावेळी हस्तक्षेप करण्यासाठी गेलेल्या दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांवर दगडफेक करीत शासकीय कामकाजात अडथळा आणला अशी तक्रार दिंद्रुड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिल्यावरून कृषी मंत्री धनंजय मुंडे, राजाभाऊ मुंडे, वाल्मिक कराड यांच्यासह 24 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आला होते. स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आला होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र माजलगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केले होते. हे प्रकरण केजच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात वर्ग झाल्यानंतर सोमवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन आरोपी पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून कृषीमंत्री धनंजय मुंडे, राजाभाऊ मुंडे, वाल्मिक कराड यांच्यासह 22 जणांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचा निकाल न्यायाधीश कुणाल जाधव यांनी दिला. या प्रकरणी ना. धनंजय मुंडे यांच्यासह इतर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अशोक कवडे यांनी काम पाहिले.

COMMENTS