श्रीगोंदा शहर प्रतिनिधी:- भारतीय सांस्कृतिक कला नृत्यभारत महोत्सव यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या राष्ट्रीय नृत्य महोत्सव 2024 स्पर्ध
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी:– भारतीय सांस्कृतिक कला नृत्यभारत महोत्सव यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या राष्ट्रीय नृत्य महोत्सव 2024 स्पर्धा नुकत्याच प.भीमसेन जोशी कला मंदिर औंध, पुणे येथे संपन्न झाल्या. सदर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये शिवाजीराव नागवडे डेफोडिल्स स्कूलच्या संघाने सहभाग घेत मनमोहक आणि दिलखेचक नृत्य आविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करत बक्षिसांची लयलूट केली.
विजेते विद्यार्थी छोटा गट-प्रथम क्रमांक (इंडियन फोक डान्स) प्रसन्ना गोलांडे, ओवी सुपेकर, शिवाज्ञा नागावडे, प्रांजल मोरे, मिहिका बायकर. तर सब जुनिअर गट (हिप हॉप) उत्तेजनार्थ आयुश्री डोळे, दिक्षा ढवळे, ईश्वरी कचरे, निखिल निकम, कार्तिकी पवार, जुनिअर गटात तृतीय क्रमांक (नटरंग-इंडियन फोक डान्स) अपूर्वा शेळके, आद्या गिरमे, प्रज्ञा शिंदे, कार्तिकी शेलार, सौम्या सस्ते, शरयू लोंढे, कार्तिकी पवार, जल पटेल, शरण्या पवार, अनन्या ढगे, मंजिरी लोहगावकर, अंजली पाटील, श्रुती आढाव, श्रुतिका पाचपुते, समीक्षा गायकवाड, सोलो डान्समध्ये प्रज्ञा शिंदे द्वितीय हीप हॉप, श्रेया बडवे, कंटेप्ररी उत्तेजनार्थ यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे डान्स कोरिओग्राफर सुमेध व प्रणाली गजभिये यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी प्रणाली गजभिये यांना गुरू विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या दैदीप्यमान कामगिरी बद्दल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधा ताई नागवडे, निरीक्षक एस.पी.गोलांडे सर, मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS